आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँशेस मालिका: ऑस्ट्रेलियाच्या अँशेसवर ‘पाणी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - यंदाच्या अँशेस मालिकेत प्रथमच विजयाजवळ पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आशेवर सोमवारी पाणी फेरले गेले. सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ विजयाकडे आगेकूच करीत होता. मात्र, वरुणराजाला हे मान्य नव्हते. पावसाचा व्यत्यय आला. अखेर सामना ड्रॉ घोषित झाला. पावसामुळे अखेरच्या दोन दिवसांत तब्बल 111 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. अखेरच्या दिवशी तर 77 षटकांचा खेळ व्यर्थ गेला.

हा सामना ड्रॉ झाल्यामुळे तीन सामन्यांनतर यजमान इंग्लंडची मालिकेत 2-0 अशी आघाडी कायम आहे. चौथ्या कसोटीला 9 ऑगस्टपासून सुरुवात होईल.

तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडला 98 षटकांत हे लक्ष्य गाठायचे होते. मात्र, त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रेयान हॅरिसने इंग्लिश कर्णधार अँलेस्टर कुकला शून्यावर बाद केले.
क्लार्क सामनावीर
जेवणाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडचा संघ 3 बाद 37 धावा असा संकटात सापडला होता. जेवणाच्या ब्रेकनंतर फक्त तीन चेंडूंचा खेळ झाला. नंतर पावसाने हजेरी लावली. सामन्यात 187 धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून रेयान हॅरिसने दोन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 527/7. इंग्लंड : 368. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 7 बाद 172. इंग्लंड दुसरा डाव : (लक्ष्य : 332) रूट नाबाद 13, 2/13 हॅरिस.