आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन मीडियानेही कांगारूंना झोडपले !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - टीम इंडियाकडून 4-0 ने कसोटी मालिकेत सडकून मार खाल्ल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडियानेही कांगारूंना झोडपले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी क्लार्क ब्रिगेडवर कडाडून टीका करताना पराभवाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. क्लार्कच्या संघाला मोठी खेळी खेळताच येत नाही, असा टोलाही मीडियाने मारला.
वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील टीका अशी


* डेली टेलिग्राफ : मागच्या 32 वर्षांतील ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी आणि हा सर्वाधिक दुर्दैवी दौरा ठरला.
* हेरॉल्ड सन : अ‍ॅशेस मालिकेपूर्वी फलंदाजांना बदलणे गरजेचे आहे. वारंवार एकच चूक करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.
* सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड : अ‍ॅशेसपूर्वी फलंदाजांना आपली मानसिकता दुरुस्त करावी लागेल. अजून ते मोठ्या खेळीसाठी गंभीर नाहीत.
* कुरिअर मेल : करारबद्ध खेळाडूंबाबत पुनर्विचार व्हायला हवा. अनेक खेळाडूंना राजकुमारासारखे मानधन मिळत आहे, मात्र त्यांची कामगिरी भिका-यासारखी आहे.
वॉटसनवरही टीका
‘द टेलिग्राफ’च्या मते, शेन वॉटसनने संघातील आपले स्थान पक्के समजू नये. त्याची कामगिरी वाईटच ठरली आहे. तळाचा फलंदाज पीटर सिडल दोन्ही डावांत अर्धशतके ठोकू शकतो. मात्र, वॉटसन चुकीचे फटके मारून दोन्ही डावांत बाद होतो.