आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसअखेर ऑस्‍ट्रेलिया बिनबाद 30, विजयासाठी 201 धावांची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना रंगतदार अवस्‍थेत आला आहे. इंग्‍लंडच्‍या फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी केल्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाला विजयाची नामी संधी मिळाली आहे. ऑस्‍ट्रेलियाने इंग्‍लंडला 179 धावांमध्‍येच गुंडाळले असून विजयासाठी 231 धावांचे लक्ष्‍य मिळाले. तिस-या दिवसाचा खेळ थांबला त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियाने बिनबाद 30 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्‍या दिवसाचा खेळ सुरु होईल, त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांची गरज राहणार आहे.

ऑफस्पिनर नॅथन लियॉनने 5 बळी घेतले. तर मिशेल जॉन्‍सनने 3 फलंदजांना तंबुत पाठविले. इंग्‍लंडने ऑस्‍ट्रेलियाला पहिल्‍या डावात रोखून 51 धावांची आघाडी मिळविली होती. त्‍यानंतर कर्णधार ऍलिस्‍टर कुक आणि मायकल कार्बेरी यांनी 65 धावांची सलामी देऊन चांगली सुरुवात करुन दिली होती. परंतु, इंग्‍लंडच्‍या खेळाडुंनी बेजबाबदार फटके मारुन विकेट्स फेकल्‍या. त्‍यामुळे मोठी आघाडी घेता आली नाही. नॅथन लियॉनच्‍या गोलंदाजीवर मोठे फटके मारण्‍याच्‍या नादात केविन पीटरसन, बेन स्‍टोक्‍स, इयन बेल हे फलंदाज ऐन मोक्‍याच्‍या क्षणी बाद झाले.

तत्‍पुर्वी, ऑस्‍ट्रेलियाचा यष्‍टीरक्षक ब्रॅड हॅडीन याने दमदार फलंदाजी करत 65 धावांची झुंझार खेळी केली. त्‍याने अखेरच्‍या विकेटसाठी लियॉनसोबत 40 धावा जोडून इंग्‍लंडच्‍ी आघाडी कमी केली.