आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Number 1 In Test And ODI ICC Ranking News In Hindi

ICC रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल, भारताची पाचव्या स्थानावर घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - या वर्षी इंग्लंडला अ‍ॅशेज मालिकेमध्ये 5-0 ने व्हाइट वॉश देणारा ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल ठरला आहे. ऑगस्ट 2009 नंतर कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया क्रमांक एकवर येण्याची ही पहिली वेळ आहे. कसोटीच नाही तर ऑस्ट्रेलियाने एक दिवसीय समान्यातही अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर कसोटीत भारताचा क्रमांक पाकिस्तानच्याही खाली गेला आहे.
पॉइंटच्या फरकाने ऑस्ट्रेलिया अव्वल
जानेवारी 2014 मध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या अ‍ॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाहुण्या इंग्लंडला 5-0 ने मात दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये दक्षिण अफ्रिका दौ-यावर कांगारुंनी 2-1 ने मालिका जिंकली होती. त्यामुळे काही पॉइंटनी ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला मागे ढकलले आहे. दोन्ही संघांचे गुण 123 आहेत. मात्र, काही पॉइंटच्या फरकाने ऑस्ट्रेलिया अव्वल आहे.

भारताची पाचव्या पायरीवर घसरण
न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर फ्लॉप ठरेलेली टीम इंडिया रँकिंमध्ये तिस-या पायरीवरून घसरण होऊन पाचव्या स्थानावर गेली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला अनुक्रमे 4-0 आणि 2-0 ने मात दिल्यानंतर टीम इंडियाचे रँकिंगमधील स्थान बळकट झाले होते. मात्र, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध 1-0 ने झालेला पराभव भारताचे गुण कमी करणारा ठरला.
नवी टेस्ट रँकिंग
1 - ऑस्ट्रेलिया - 123
2 - दक्षिण अफ्रिलका - 123
3 - इंग्लिंड - 104
4 - पाकिस्तान - 103
5 - भारत -102
6 - न्यूझीलंड - 92
7 - श्रीलंका - 90
8 - वेस्ट इंडिज -76
9 - झिम्बॉम्बे - 40
10- बांगलादेश - 21

पुढील स्लाइडमध्ये, ऑस्ट्रेलियाचे कसोटीतील साम्राज्य फार काळ नाही..