मेलबर्न - माजी नंबर वन पुरुष खेळाडू
राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत पोहोचण्यासाठी बुधवारी ४ तास आणि १२ मिनिटे घाम गाळावा लागला. त्याला जागतिक क्रमवारीतील ११२ व्या क्रमांकाचा अमेरिकेचा खेळाडू टीम स्मिजँकने या संघर्षासाठी भाग पाडले. पुरुष गटात स्विसकिंग रॉजर फेडरर, इंग्लंडचा अँडी मुरे आणि महिला गटात रशियाच्या मारिया शारापोवा यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.