आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open : Serena Defeated, Ana Ivanovick Entered In Final

ऑस्ट्रेलियन ओपन: सेरेनाचे पॅकअप; अ‍ॅना इव्हानोविक उपांत्यपूर्व फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सला पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप करावे लागले. यासह तिचे एकेरीचा 18 वा ग्रँडस्लॅम जिंकून मार्टिनाच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचे स्वप्नही भंगले.
अ‍ॅना इव्हानोविकने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला रोमहर्षक लढतीत 4-6, 6-3, 6-3 ने धूळ चारली. यासाठी तिला एक तास 56 मिनिटे झुंज द्यावी लागली. तिने लढतीत 33 विनर्स आणि एक ऐस मारला. या विजयासह सर्बियाच्या खेळाडूने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. चीनच्या ली नाने मकारोवाला 6-2, 6-0 ने हरवले.


पेस विजयी; बोपन्ना बाहेर
लिएंडर पेसने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने रादेक स्तेपानेकसोबत युकी भांबरी व व्हिनसला 6-3, 6-2 ने पराभूत केले. दुसरीकडे रोहन बोपन्ना व ऐसाम कुरेशीला लढतीत ट्रेट हुये-डोमिनिक इंग्लोटने 6-4, 7-6 असे हरवले.