आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा : फेडरर, अजारेंका, सेरेना चौथ्या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - दुसरा मानांकित स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि तिसरा मानांकित इंग्लंडच्या अँडी मुरेने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटात अव्वल मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका, अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि दहावी मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन
वोज्नियाकी यांनीसुद्धा चौथ्या फेरीत प्रवेश निश्चित केला.

फेडररने ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकला 6-4, 7-6, 6-1 ने हरवले. मुरेने लिथुनियाच्या रिकॉर्ड्स बेरॉकिसला 6-3, 6-4, 7-5 ने मात दिली. सेरेनाने जपानच्या मोरिसाला 6-1, 6-3 ने हरवले. अजारेंकाने अमेरिकेच्या जेमी हॅम्पटला 6-4, 4-6, 6-2 ने ने मात दिली, तर कॅरोलिन वोज्नियाकीने लेसिया सुरेंकीला 6-4, 6-3 ने हरवले.

भूपती तिसर्‍या फेरीत
महेश भूपती आणि कॅनडाच्या डॅनियल नेस्टर या पाचव्या मानांकित पुरुष दुहेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. रोहन बोपन्नाची कामगिरी संमिश्र ठरली. पुरुष दुहेरीत तो पराभूत झाला, तर मिश्र दुहेरीत त्याने दुसरी फेरी गाठली. भारताचा लियांडर पेस आणि रशियाची जोडीदार एलिना वेस्निना यांनी मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली.