आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: ली ना सेमीफायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - दोन वेळची उपविजेती ली नाने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सला बाहेरचा रस्ता दाखवणा-या अ‍ॅना इव्हानोविकलाही स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. तिला कॅनडाच्या नवोदित इयुगेनी बुचार्डने पराभूत केली.
पुरुष गटात जगातील माजी नंबर वन नोवाक योकोविकला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. त्याला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत स्टॅनलिस वांवरिकाने धूळ चारली. तब्बल पाच सेट्सपर्यंत रंगलेल्या लढतीत वांवरिकाने बाजी मारली. दुसरीकडे स्पेनच्या डेव्हिड फेररलाही पराभवाला सामोरे जावे लागले. चेक गणराज्यच्या टॉमस बर्डिचने उपांत्यपूर्व सामन्यात फेररवर मात केली.
दोन तासांत इव्हानोविकचे स्वप्न भंगले
जगातील माजी नंबर वन अ‍ॅना इव्हानोविकचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न अवघ्या दोन तासांत भंगले. अमेरिकेच्या सेरेनाला नमवून आत्मविश्वास बुलंदीवर असलेल्या अ‍ॅनाला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. तिला कॅनडाच्या इयुगेनी बुचार्डने पराभूत करून स्पर्धेत मोठा धक्कादायक विजय मिळवला. तिने दोन तास 24 मिनिटे रंगलेल्या लढतीत सर्बियाच्या अ‍ॅनाला 5-7, 7-5, 6-2 अशा फरकाने धूळ चारली.
सानिया-काराचा पराभव
भारताची सानिया मिर्झा व झिम्बाव्वेची कारा ब्लॅकचे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले. या सहाव्या मानांकित जोडीला महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. इटलीची सारा इराणी व रॉबर्टा विन्सीने लढतीत सानिया-काराला 6-2, 3-6, 6-4 ने पराभूत केले.
योकोविकची झुंज अपयशी
सर्बियाच्या नोवाक योकोविकने चार तासांपर्यंत दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्याला स्वीसच्या वांवरिकाने पाच सेट्समध्ये पराभूत केले. त्याने 2-6, 6-4, 6-2, 3-6, 9-7 अशा फरकाने विजय मिळवला. यासह त्याने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. स्वीसच्या खेळाडूने लढतीत 219 किमी प्रति तासाच्या वेगाने योकोविकविरुद्ध सर्व्हिस केली. यासह त्याने लढतीत 17 ऐस मारले. त्याला शेवटच्या सेटमध्ये विजयासाठी 79 मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली.
दोन सेट्समध्ये ली ना विजयी
चौथ्या मानांकित ली नाने सरळ दोन सेट्समध्ये उपांत्यपूर्व सामना आपल्या नावे केला. तिने इटलीच्या फ्लेविया पेनेट्टावर मात केली. तिने 6-2, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. तिने अवघ्या 67 मिनिटांत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. चीनच्या खेळाडूने 35 मिनिटांत पहिला सेट जिंकला. त्यानंतर तिने दुस-या सेटमध्येही 32 मिनिटांत सहज विजय मिळवला. ली नाने लढतीत एक ऐस आणि 14 विनर्स मारले. आता तिचा उपांत्य सामना इयुगेनी बुचार्डशी रंगणार आहे.
ली नाचा धमाका
02 सेटमध्ये विजय
67 मिनिटांत बाजी मारली
01 ऐस मारला
23 विनर खेचले
विजयामुळे समाधानी
या विजयाने मी अधिक आनंदी झाले आहे. आता उद्या मला विर्शांतीची संधी मिळेल. यातून मी कोच कालरेस रॉड्रिग्ज आणि आपल्या टीमशी चर्चा करून पुढच्या फेरीच्या सरावाची तयारी करू शकेन.
ली ना, चीनची टेनिसपटू