आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: सेरेना, योकोविकची आगेकूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - चार वेळेसचा चॅम्पियन सर्बियाचा नोवाक योकोविक आणि जगातली नंबर वन महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपले विजयी अभियान कामय ठेवले आहे. जबरदस्त गरमीत दोघांनी विजय मिळवले.योकोविक सलग चौथ्यांदा किताब जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने संयमी कामगिरी करताना अर्जेंटिनाच्या लियानार्दो मेयरविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत 6-0, 6-4, 6-4 ने विजय मिळवला. मेयरला संपूर्ण सामन्यात एकदाही दमदार आव्हान सादर करता आले नाही. आता तिस-या फेरीत योकोविकचा सामना 30 वा मानांकित रशियाच्या दिमित्री तुर्सुनोवशी होईल.
सेरेनाची मार्गरेट कोर्टशी बरोबरी : पाच वेळेसची चॅम्पियन सेरेनाने सर्बियाच्या वेस्ना डोलोनला 6-1, 6-2 ने हरवले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत हा तिचा 60 वा विजय ठरला. यासोबत तिने आधुनिक टेनिसच्या युगात या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या मार्गरेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी केली.
ली ना तिस-या फेरीत : महिला गटात अव्वल मानांकित सेरेनाशिवाय मागच्या वेळेसची उपविजेती चीनची ली ना आणि नववी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बर यांनीसुद्धा तिस-या फेरीत विजय मिळवला. महिला गटातील चीनच्या लीने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचला 6-0, 7-6 ने मात दिली. अँजोलिक कर्बरने दुस-या फेरीत रशियाच्या अ‍ॅला कुर्दियावत्सेवाला 6-4, 6-2 ने हरवले.
डेव्हिड फेरर पुढच्या फेरीत : पुरुष गटात जगातला तिस-या क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या डेव्हिड फेररने फ्रान्सच्या आंद्रियन मन्नारिनोला 7-6, 5-7, 6-0, 6-3 ने मात दिली. इतर एका लढतीत टॉमस बर्डिचने फ्रान्सच्या कॅनी डी शेपरला 6-4, 6-1, 6-3 ने हरवले. रिचर्ड गास्केटने निकोलई देविदेंकोला 7-6, 6-4, 6-4 ने पराभूत केले. विसावा मानांकित पोलंडच्या येर्जी यानोविकने तिस-या फेरीत प्रवेश केला.
दिविज शरण पराभूत
भारताचा दिविज शरण आणि चिनी तेयपैचा येन सुन लू यांना जोहान ब्रुनस्टाम (स्वीडन) आणि फ्रेडरिक निल्सन (डेन्मार्क)कडून 2-6, 4-6 ने पराभवाचा सामना करावा लागला.
युकी, भूपती दुस-या फेरीत
भारताचा भूपती आणि त्याचा जोडीदार राजीव रामने बुधवारी पहिल्या फेरीत कोलंबियाचा सेंटियागो गिराल्डो आणि पोर्तुगालचा जोआओ सुसा यांना दोन तास आणि दोन मिनिटे चाललेल्या सामन्यात 4-6, 6-3, 6-4 ने हरवले. युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकेन व्हीनसने रॉबर्टो बतिस्ता आणि डॅनियल गिमेनो ट्रेवर या स्पेनच्या जोडीला एक तास आणि 11 मिनिटांत 6-2, 7-5 ने मात दिली.