आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open Tennis : Sharapova, Mure, Fedarra Entered In Fourth Round

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : शारापोवा, मुरे, फेडरर चौथ्या फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - विक्रमी 17 ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर, विम्बल्डन चॅम्पियन अ‍ॅँडी मरेने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. महिला गटात दोन वेळची चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंका आणि तिस-या मानांकित मारिया शारापोवाने ऑस्ट्रेलियन आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली.
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या मिलोस राओनिक आणि जगातील माजी नंबर वन महिला टेनिसपटू कॅरोलीन वोज्नियाकीला तिस-या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने करिअरमध्ये 27 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची चौथी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत रशियाच्या तैमूराज गबाशविलीला सलग सेटमध्ये धूळ चारली. त्याने 6-2, 6-2, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला.
पुरुष गटात चौथ्या मानांकित अ‍ॅँडी मरेने आगेकूच केली. इंग्लंडच्या या खेळाडूने स्पेनच्या फेलिसियानो लोपेजला 7-6, 6-4, 6-2 ने पराभूत केले.
अझारेंकाची युसबर्गरवर मात
बेलारूसच्या अझारेंकाने ऑस्ट्रियाच्या वोने युसबर्गरला 6-1, 6-0 ने पराभूत केले. मारिया शारापोवाने फ्रान्सच्या एलिज कोर्नेटला 6-1, 7-6 ने मात केली. माजी नंबर वन खेळाडू कॅरोलीन वोज्नियाकीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला स्पेनच्या गार्बिन मुगुरुज्जा ब्लांकोने 4-6, 7-5, 6-3 ने धूळ चारली.
बोपन्ना, पेस अंतिम 16 मध्ये
लिएंडर पेसरोहन बोपन्नाने अंतिम 16 मधील प्रवेश निश्चित केला. महेश भूपतीचा पराभव झाला. पेस व स्तेपानेकने लढतीत डॅनियल व दोल्गोपोलोवला 6-1, 6-4 ने हरवले. बोपन्ना- कुरेशीने इंग्लंडच्या कोलिन लेमिंग-रोस हचिन्सवर 4-6, 6-3, 6-2 ने मात केली. पेया आणि ब्रुनो सुआरेसेने भूपती-राजीव रामला 6-4, 7-6 ने पराभूत केले.