आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Open Tennis : Sonia Entered In Semifinal

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: सानियाची उपांत्य फेरीत धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - महिला दुहेरीतील पराभवानंतर सावरलेल्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताची सानिया मिर्झा व रोमानियाचा होरिया टिकाऊ या जोडीने उपांत्यपूर्व लढतीत शानदार विजय मिळवला. या सहाव्या मानांकित जोडीने लढतीत पाकिस्तानचा ऐसाम-उल-हक कुरेशी आणि ज्युलिया जॉर्जला 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. इंडो-रोमानिया जोडीने अवघ्या 63 मिनिटांत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. आता या जोडीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गाजडोसोवा-मॅथ्यू एबडेन यांच्याशी होईल. या दुस-या मानांकित जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात कॅटरिना व रोहन बोपन्नाला 7-5, 6-3 अशा फरकाने पराभूत केले.
चौथी मानांकित चीनची खेळाडू ली नाने कॅनडाची युवा खेळाडू युजिनी बुकार्डला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सरळ सेटमध्ये 6-2, 6-4 ने मात दिली. यासह मागच्या चार वर्षांत तिने तिस-यांदा फायनलमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला. मागच्या वर्षी फायनलमध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाकडून ली नाचा पराभव झाला होता, तर 2011 मध्ये किम क्लिजस्टर्सने तिला फायनलमध्ये मात दिली. 2012 मध्ये क्लिजस्टर्सनेच तिला चौथ्या फेरीत पराभूत करून स्पर्धेबाहेर केले होते.
सिबुलकोवाची सहज बाजी
महिला एकेरीच्या दुस-या सेमिफायनलमध्ये 20 वी मानांकित स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवाने पाचवी मानांकित पोलंडच्या एग्निजस्का रंदावास्काला चकित करताना सरळ सेटमध्ये 6-1, 6-2 ने पराभूत केले.
मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात लिएंडर पेस आणि त्याची जोडीदार स्लोव्हाकियाची डॅनियला हंचुकोवा यांना फ्रान्सची क्रिस्टिना लाडेनोविक आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर या जोडीकडून सरळ सेटमध्ये 6-3, 6-3 ने पराभवाचा सामना करावा लागला.
वावरिंकाचा चार सेट्समध्ये विजय
स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने बर्डिचविरुद्ध उपांत्य सामन्यात शानदार विजय मिळवला. अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यातील दुसरा, तिसरा आणि चौथा सेट अत्यंत रोमांचक ठरला. वावरिंकाने 217 कि.मी. ताशी वेगाने सर्व्हिस करताना गुण मिळवले. त्याने 14 नेट पॉइंट आणि 57 विनर मारले. वांवरिकाने बर्डिचला 6-3, 6-7, 7-6, 7-6 ने हरवले.
ली ना-सिबुलकोवा यांच्यात फायनल
आशियातील एकमेव ग्रँडस्लॅम चॅम्पियन चीनच्या ली नाने सलग दुस-यांदा गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये तिचा सामना 20 वी मानांकित स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवाशी होईल. फायनल सामना शनिवारी खेळवला जाईल.