सिडनी - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जपानच्या अॅरिको हिरोसे हिला 21-18, 12-9 ने हरवून ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, पी. व्ही. सिंधूला उपउपांत्य फेरीतच पराभवाचा सामना करत स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
सायनाने हिरोसेला 47 मिनिटांतच पराभूत करत सिंगापूर ओपनमध्ये तिच्याकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. लढतीच्या सुरुवातीपासूनच सायनाचे सामन्यावर वर्चस्व होते. पहिल्या सेटमध्ये सायनाने 8-2 ची आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर हिरोसेने हा सेट 10-10 वर आणून बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने 21-18 ची आघाडी घेत पहिला सेट आपल्या नावे केला. दुसर्या सेटमध्ये सायनाने 21-9 आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य एका लढतीत भारताची पी. व्ही. सिंधू स्पेनच्या कॅरोलिना मारीनकडून 21-17, 21-17 अशा थेट सेटमध्ये पराभूत झाली. या दोघींत 2011 नंतर झालेली ही पहिलीच लढत होती. मात्र, सिंधूला यात पराभवाचा सामना करावा लागला.