आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Tennis Open : Sania Mirza, Bopanna, Pease Entered In Semifinal

ऑस्ट्रेलिया टेनिस ओपन : सानिया मिर्झा, बोपन्ना, पेस उपांत्यपूर्व फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि रोहन बोपन्नाने विजयी मोहीम कायम ठेवताना ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला खेळाडू सानियाने अवघ्या 72 मिनिटांत अंतिम आठमधील स्थान निश्चित केले.
सानियाने झिम्बाव्वेच्या कारा ब्लॅकसोबत शानदार विजय मिळवला. या सातव्या मानांकित जोडीने कॅनडाच्या इयुगेनी बुचार्ड आणि रशियाच्या वेरा दुशेविनावर मात केली. या जोडीने 72 मिनिटांत 6-4, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. आता या जोडीचा सामना दुहेरीतील बलाढ्य सारा इराणी व राबर्टा विन्सी या जोडीशी होईल.
पेस-हंतुचोवाची आगेकूच
मिश्र दुहेरीत लिएंडर पेस व डॅनियला हंतुचोवासोबत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या जोडीने महेश भूपती-एलेना वेस्नीनाला 6-0, 2-6, 10-6 अशा फरकाने पराभूत केले.
बोपन्ना-कॅटरिना विजयी
पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर रोहन बोपन्नाने पराभवाला दूर सारून मिश्र दुहेरीच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. त्याने स्लोव्हाकियाच्या कॅटरिना सबरेतनिकसोबत सामना जिंकला. या जोडीने एश्ले बार्टी-जॉन पियर्सवर 7-6, 7-5 ने मात केली. आता या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जर्मिला गाजदोसोवा-मॅथ्यू एबडेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
शारापोवाचे आव्हान संपुष्टात
मारिया शारापोवाला ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप करावे लागले.तिला स्लोव्हेकियाच्या डोमिनिका सिबुलकोवाने बाहेरचा रस्ता दाखवला. तिने 3-6, 6-4, 6-1 अशा फरकाने विजय मिळवला.
नदालची झुंज तीन तास रंगली
राफेल नदालने जपानच्या केई निशिकोरीवर 7-6, 7-5, 7-6 ने विजय मिळवला. त्याने तीन तास 17 मिनिटे झुंज देऊन विजयश्री खेचून आणली. यासह त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये धडक मारली.
फेडरर-अँडी मरे उपांत्यपूर्व लढत
रॉजर फेडरर व अ‍ॅँडी मरे यांच्यात एकेरीची उपांत्यपूर्व लढत रंगणार आहे. फेडररने फान्सच्या त्सोंगाला 6-3, 7-5, 6-4 ने हरवले. इंग्लंडच्या मरेने स्टीफन रॉबर्टवर 6-1, 6-2, 7-6, 6-2 ने पराभूत केले.