आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Versus South Africa Match News In Marathi, Captown, Cricket

रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी,आफ्रिकेविरुद्ध 2-1 ने मालिका विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन - मालिकेतील तिस-या आणि निर्णायक कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 245 धावांनी पराभूत करून ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह कांगारूंनी आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली. आफ्रिकेने शेवटच्या तासापर्यंत संघर्ष केला. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. आफ्रिकेला दुस-या डावात 265 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने विजय साजरा केला.


ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर आफ्रिकेपुढे विजयासाठी 511 धावांचे कठीण लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसअखेरच आफ्रिका संघ 4 बाद 71 असा संकटात सापडला होता. यानंतर पाचव्या दिवशी आफ्रिकेकडून एल्बी डिव्हिलर्स (43), फॉप डु प्लेसिस (47), जे.पी. डुमिनी (43) आणि वेर्नोन फिलेंडर (51) यांनी संघर्षपूर्ण फलंदाजी केली. फिलेंडरने अखेरपर्यंत झुंज दिली. ऑस्ट्रेलियाकडून रेयान हॅरिसने 4, मिशेल जॉन्सनने 3 तर पॅटिन्सनने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 7/494. द. आफ्रिका पहिला डाव 287. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 5/303. आफ्रिका दुसरा डाव 265.