आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Vs England Melbourne Test Day 2 Update

इंग्लिश गोलंदाजांची धमालः मेलबोर्न कसोटी रोमांचक अवस्‍थेत, ऑस्‍ट्रेलिया 9 बाद 164

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- अ‍ॅशेस कसोटी मालिकेत इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलियन खेळाडुंची कट्टर स्‍पर्धा मेलबोर्न येथे सुरु असलेल्‍या चौथ्‍या कसोटीत दिसून आली. इंग्‍लंडच्‍या वेगवान गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत सामन्‍यात कमबॅक केले आहे. पहिल्‍या डावात फक्त 255 धावा काढल्‍यानंतर जेम्‍स ऍंडरसन आणि स्‍टुअर्ट ब्रॉड या जोडीने कांगारुंची फलंदाजी कापून काढली. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियाची 9 बाद 164 अशी स्थिती होती.

मिशेल जॉन्‍सनच्‍या भेदक मा-यापुढे इंग्‍लंडने पहिल्‍याच दिवशी सपशेल नांगी टाकली होती. जॉन्‍सने 5 फलंदाजाना बाद केले होते. आज इंग्‍लंडने 6 बाद 226 धावसंख्‍येवरुन खेळ सुरु केला. परंतु, त्‍यांचा डाव 255 धावांवर संपुष्‍टात आला. काल नाबाद असलेला केविन पीटरसन 71 धावांवर तंबुत परतला. रॅन हॅरिसने 2 तर पीटर सिडल, शेन वॉटसन आणि नॅथन लियॉन यांनी प्रत्‍येक एक बळी घेतला.

फलंदाजांनी नांगी टाकल्‍यानंतर इंग्‍लंडच्‍या गोलंदाजांनी कमाल केली. ऍंडरसन आणि ब्रॉड यांनी प्रत्‍येकी 3 बळी घेतले. त्‍यातही ऍंडरसनने ऑस्‍ट्रेलियाची मधली फळी उद्ध्‍वस्‍त केली. त्‍याला टीम ब्रेस्‍ननने 2 बळी घेत दमदार साथ दिली. ऍंडरसनने धोकादायक .डेव्‍हीड वॉर्नरला लवकर बाद केले. त्‍यानंतर बेन स्‍टोक्‍सने शेन वॉटसनला तंबूत पाठविले. कर्णधार मायकल क्‍लार्कचा ऍंडरसनने अप्रतिम चेंडुवर त्रिफळा उडवून कांगारुंना मोठा धक्‍का दिला. त्‍यानंतर स्‍टीव्‍ह स्मिथ 19 धावांवर बाद झाला. तर जॉर्ज बेली शून्‍यावर परतला. यष्‍टीरक्षक ब्रॅड हॅडिन आणि सलामीवीर ख्रिस रॉजर्स यांनी खिंड लढविली. परंतु, रॉजर्स 61 धावांवर बाद झाला. खेळ संपला त्‍यावेळी हॅडीन 43 धावांवर नाबाद होता. पहिल्‍या डावात इंग्‍लंडकडे सध्‍या 91 धावांची आघाडी आहे. उद्या ऑस्‍ट्रेलियाचा डाव गुंडाळून मोठी आघाडी घेण्‍याचा इंग्‍लंडचा प्रयत्‍न राहणार आहे.

ऑस्‍ट्रेलिया आणि इंग्‍लंड यांच्‍यातील अ‍ॅशेस मालिका अनेक कारणांनी चर्चे राहिली आहे. दोन्‍ही संघांमध्‍ये जबरदस्‍त संघर्षाची भावना असते. या दोन कट्टर प्रतिस्‍पर्ध्‍यांमध्‍ये खरी चुरस मेलबोर्नमध्‍ये दिसत आहे.

या सामन्‍यातील काही छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..