आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Vs India Test Series Australia Ad Kowan Comment

टीम इंडियाचा सुपडासाफ करण्‍यासाठीच मैदानात उतरणार - कोवान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडलेड: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अ‍ॅडलेड येथे खेळल्या जाणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यात 4-0 ने विजय संपादन करून टीम इंडियाचा सुपडासाफ करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज एड कोवान म्हणाला.
ऑस्ट्रेलिया संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 अशी आघाडी मिळविली आहे. भारतविरुद्ध ही कसोटी मालिका ‍आम्ही खिशात घातली असली तरी 24 जानेवारीपासून अ‍ॅडलेडमध्ये होणार्‍या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने पराभूत करू, असे त्याने सांगितले.
भारतविरुद्ध तीन कसोटी सामन्यात 166 धावा करणार्‍या कोवानने संघात स्थान कायम करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. परंतु वॉटसनचे पुनरागमन झाल्याने त्याला भीती वाटत आहे. वॉटसन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर असून संघाला त्याची गरज आहे. मी माझ्या कामगिरीत सुधारणा केली आहे. आता निर्णय निवड समितीने घ्यायचा आहे, असेही त्याने सांग‍ितले.