सिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने रविवारी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. यजमान संघाने तिस-या व शेवटच्या सामन्यात २ गड्यांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने २-१ ने तीन टी-२० सामन्यांची मालिका
आपल्या नावावर केली. सामनावीर कमरून व्हाइट (नाबाद ४१), ग्लेन मॅक्सवेल (२३) आणि कर्णधार अॅरॉन फिंच (३१) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या बळावर यजमान संघाने १९.५ षटकांत सामना आपल्या नावे केला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी गमावून १४५ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात कांगारूंनी आठ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. यासह यजमान संघाने मालिका आपल्या नावे केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत डेव्हिड आणि रॉबिन पीटरसनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. मात्र,त्यांना यजमानांना रोखता आले नाही.
आफ्रिका संघाकडून सलामीवीर हेड्रिक्सने ४९, डी काॅक ४८ अाणि डेव्हिड मिलरने केलेली ३४ धावांची खेळी व्यर्थ ठरली. गोलंदाजीत कांगारूंच्या फ्युकनरने घरच्या मैदानावर धारदार गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.