आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Won The Toss And Elected To Bat First In India Aus Practice Match

India-Aus सराव सामना : 106 धावांनी ऑस्‍ट्रेलियाचा दणदणीत विजय, भारत सर्वबाद 265

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - विश्‍वचषकातील पहिल्‍याच सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत समोरासमोर आले आहेत. ऑस्‍ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 372 धावांचा डोंगर उभा केला होता.
प्रत्‍युत्‍तरादाखल मैदानात उतरलेली टीम इंडिया 45.1 षटकात सर्वबाद झाली. ऑस्‍ट्रेलियाने भारतावर 106 धावांनी दणदणीत विजय मिळविला. ऑस्‍ट्रेलियाकडून कुमिन्‍सने 3, स्‍टॉर्क,जॉन्‍सन, आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्‍येकी 2 विकेट पटकाविल्‍या.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
भारताकडून सर्वांधीक धावा अजिंक्‍य रहाणे (66), त्‍यापाठोपाठ शिखर धवन (59) केल्‍या. रोहित शर्मा, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, स्‍टुअर्ट बिन्‍नी, अक्षर पटेल आणि अश्विन यांना दुहेरी संख्‍या सुध्‍दा गाढता आली नाही.
भोपळा न फोडता बाद झाला धोनी
सलामीचे खेळाडू झटपट बाद होत असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कडून आज काही ठेवणीतील शॉट्स पाहण्‍याची इच्‍छा होती. परंतु धोनीला धावांचा भोपळाही फोडता आला नाही. तो स्‍टार्ककडे एक सोपा झेल देऊन तंबूत परतला.
भारताची सलामीच गडगडली
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा केवळ 8 धावसंख्‍येवर परतला आहे. तर त्‍यापाठोपाठ आलेला विराट कोहली केवळ 18 धावांवर तंबूत परतला आहे.
मॅक्‍सवेल-मिलरची शतके
ऑस्‍ट्रेलियाच्‍या मॅक्‍सवेल (122) आणि डेव्हिड मिलर (104) यांच्‍या शतकी धावसंख्‍येच्‍या बळावर ऑस्‍ट्रेलियाने भारतासमोर 372 धावांचा डोंगर उभा केला आहे.
48.2 षटकात सर्वबाद
ऑस्‍ट्रेलियन संघ 48.2 षटकात सर्वबाद झाला. भारताकडून सर्वांधीक तीन विकेट मोहम्‍मद शमीने पटकाविल्‍या. मोहित शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्‍येकी दोन विकेट मिळविल्‍या. बिन्‍नी आणि अक्षर पटेल यांना प्रत्‍येकी एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलिया (फलंदाजी)
डेविड वॉर्नर : 104
आरोन फिंच : 20
शेन वॉटसन : 22
जॉर्ज बॅली : 44
ग्लेन मॅक्सवेल : 122

गोलंदाजी (भारत)
स्टुअर्ट बिन्नी : 1
मोहम्मद शमी : 1
मोहित शर्मा : 2
अक्षर पटेल : 1
उमेश यादव : 2
भारतीय संघाला तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र, आता ती जुनी गोष्ट ठरली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सराव लढतीत टीम इंडिया आपल्या सर्व खेळाडूंना तपासू शकते.
भारतीय संघ दुस-या सराव सामन्‍यामध्‍ये अफगाणिस्‍तानसोबत लढणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी हा सामना अॅडिलेड मैदानावर होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी ऑस्‍ट्रेलिया अफगा‍निस्‍तानसोबत भिडणार आहे.
उभ्‍ाय संघ
भारत : महेंद्रसिंग धाेनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मो. शमी.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टिवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली, ब्रेड हॅडिन, मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, जोश हेझलवूड, झेव्हियर डोहर्ती, मिशेल मार्श.
पुढील स्‍लाडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची रोमहर्षक छायाचित्रे...