आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Worst ODI Performance In History Kulasekara Five Wickets

PHOTOS: श्रीलंकेच्या मा-यापुढे कांगारू झाले नतमस्‍तक...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्‍बेन- श्रीलंकेविरूद्धच्‍या वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्‍ट्रेलियाला लाजीरवाणा असा ठरला. नुआन कुलसेखराच्‍या स्विंग गोलंदाजीसमोर ऑस्‍ट्रेलियाच्‍या दिग्‍गज फलंदाजांनी अक्षरश: माना तुकवल्‍या. ऑस्‍ट्रेलियाचा संघ 26.4 षटकात अवघ्‍या 74 धावांत संपुष्‍टात आला. श्रीलंकेने हा सामना 4 गडी आणि 30 षटके राखून खिशात घातला.

एकवेळ ऑस्‍ट्रेलिया अर्धशतकही करतील की नाही अशी शक्‍यता होती. मात्र, तळाचा फलंदाज मिशेल स्‍टार्क आणि जेवियर डोहर्टी यांनी 34 धावांची भागीदारी केल्‍यामुळे संघाला अर्धशतक फलकावर लावता आले. या दोघांनाच दुहेरी आकडा पार करता आला.

फोटोंमधून पाहा ऑस्‍ट्रेलियन फलंदाजांची उडालेली दाणादाण...