आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घायाळ टीम इंडियाच्‍या जखमेवर पीटर सिडलने चोळले मीठ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऍडिलेड- पराभवाने घायाळ झालेल्‍या भारतीय संघाच्‍या जखमेवर ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने मीठ चोळण्‍याचे काम केले आहे. भारताविरूद्धची मालिका 3-0 ने जिंकली असली तरी ऑस्‍ट्रेलिया संघ स्‍वस्‍थ बसणार नसल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे. मालिकेतील शेवटच्‍या सामन्‍यातही आपण पूर्णपणे ताकदीने उतरणार असल्‍याचे त्‍यांने सांगितले.

संघाच्‍या शानदार प्रदर्शनावर भाष्‍य करताना सिडल म्‍हणाला की, संपूर्ण मालिकेत आम्‍ही भारतावर दबाव कायम ठेवण्‍यात यशस्‍वी ठरलो. भारतीय संघाच्‍या नाकीनऊ आणण्‍याचे काम संघाने केले आहे आणि शेवटच्‍या सामन्‍यातही आम्‍ही असेच करणार आहोत. ऑस्‍ट्रेलियन संघाकडून खेळणे ही सन्‍मानाची बाब असते. त्‍यामुळे मला माझी जागा दुस-या कोणाला द्यावयाची नाही. पीटर सिडलने मालिकेत आतापर्यंत 17 गडी बाद केले आहेत. त्‍याने 30 कसोटीमध्‍ये 29. 75 च्‍या सरासरीने 108 बळी टिपले आहे.
सरावाला सुट्टी घेऊन धोनी सपत्‍नीक पोहोचला वाईनयार्डमध्‍ये!