आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Cricket Team Continue Their Winning Combination

चौथ्‍या कसोटीसाठी ऑस्‍ट्रेलियाचा विजयी संघ कायम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्‍ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्‍यातील 24 जानेवारीपासून सुरू होणा-या चौथ्‍या कसोटी सामन्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियाने आपला विजयी संघ कायम ठेवला. ऑस्‍ट्रेलियाने यापूर्वीच चार सामन्‍यांची मालिका 3-0 ने जिंकली आहे.

ऍडिलेड येथे होणा-या कसोटीत भारताला धूळ चारून मालिका 4-0 ने जिंकण्‍याचे ऑस्‍ट्रेलियाचे उद्धीष्‍ट आहे. फॉर्मात नसलेल्‍या शॉन मार्शचे संघातील स्‍थान कायम ठेवण्‍यात आले तर ऍडिलेड येथील खेळपट्टी फिरकीस साथ देणारी असल्‍यामुळे फिरकीपटू नॅथन लिऑनलाही संधी देण्‍यात आली आहे.

ऑस्‍ट्रेलिया संघ-
मायकल क्लार्क (कर्णधार), इडी कोवान, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, मायकल हसी, ब्रॅ़ड हॅडिन, पिटर सिडल, मिचेल स्टार्क, बेन हिल्फेनहॉस, नॅथन लिऑन आणि रायन हॅरिस.
टीम इंडियाचा ‘ब्रँड’बाजा; बाजार उठला!