आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Cricketer Brett Lee Retired In International Cricket

ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा जागतिक कीर्तीचा वेगवान गोलंदाज बेट्र लीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर त्याने अव्वल फलंदाजांना घाम फोडला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये येणारा नेहमीचा ताणतणाव दूर करण्यासाठी मेंदू व शरीर साथ देत नसल्याची स्पष्टोक्ती त्याने या वेळी दिली. मात्र, आगामी आयपीएल टी-20 व बिगबॅश लीगमध्ये खेळणार असल्याचे त्याने सांगितले.
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे, हे अधिकृत वृत्त आहे. 13 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आपल्या सर्वांचे मला वेळोवेळी प्रेम व प्रोत्साहन मिळत गेले. त्यामुळे मी इथपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करू शकलो. त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. आपल्यासोबतचा काळ माझ्या आयुष्यात अविस्मरणीय राहणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया ली याने ट्विटवर केली.
क्रिकेटच्या 13 वर्षांच्या कालावधीमध्ये ब्रेट लीला अनेक वेळा गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला. 34 वर्षीय लीने 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने 76 कसोटी सामने खेळलेले आहेत. या वेळी पायाच्या पोटरीमध्ये त्रास झाल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. यामध्ये 17 वेळा एका डावात 4 बळी घेतल्याची नोंद त्याच्या नावे आहे.
‘आज सकाळी मी झोपेतून उठल्यानंतर मला शरीर पूर्णपणे थकले आहे असे वाटले. निवृत्ती यासाठी आवश्यक आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात र्शीलंकेत होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर खेळणे सोडून देऊ. हा माझा खासगी निर्णय आहे. खेळाडूंना मी एक सल्ला देतो की, शरीर व मन थकले की, खेळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून हे मी फार जवळून अनुभवत आहे,’ असेही तो म्हणाला.
ब्रेट लीने 13 वर्षांच्या कारकीर्दीत 76 कसोटी सामन्यांमध्ये 30.81 च्या सरासरीने 310 बळी घेतले आहेत. 221 वनडे सामन्यात 23.36 च्या सरासरीने त्याने 380 बळी मिळवले आहेत.
यंदाच्या मोसमात त्याला अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. पायाच्या दुखापतीसह गुडघ्याला झालेली जखम व अपेंडिक्सचा यामध्ये समावेश आहे.
‘यू आर द वन फॉर मी’ - भारतामध्ये ब्रेट लीला अधिकाधिक लोकप्रियता मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर निष्णात असलेल्या लीने संगीतामध्येही आपले करिअर उज्‍जवल केले. भारतामध्ये त्याने नवीन अल्बमही तयार केला. मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांसोबत राहून त्याने ‘यू आर द वन फॉर मी’ हे गीतही बसवले होते.
निवृत्ती घेणारा तिसरा - आठवडाभरामध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ब्रेट ली तिसरा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी झिम्बाब्वेचा माजी कर्णधार तैबू व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर या दोघांनी एकाच दिवशी निवृत्तीची घोषणा केली.
ब्रेट लीने स्टंपिंग करताच सर्वांचा श्वास रोखला गेला, आणि सामना टाय !
ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळणे महत्त्वाचे : ब्रेट ली
सततच्या पराभवामुळे टीम इंडियाचे मानसिक संतुलन ढळले- ब्रेट ली