आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न- एकीकडे मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ टीम इंडियाशी लढत आहे. त्याचवेळी साता समुद्रपार मेलबर्नमध्ये जगभरातील रेसिंग स्टार्स वेगाचा थरार अनुभवत आहेत.
2013 फॉर्म्युला वन रेसिंग सिझनची पहिली रेस ऑस्ट्रेलियन ग्रांपीचा अंतिम सामना रविवारी 17 मार्च रोजी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सराव सत्रात डिफेंडिग वर्ल्ड चॅम्पियन सेबेस्टियन व्हेटेल सर्वात वेगवान ड्रायव्हर ठरला आहे.
शनिवारी झालेल्या सत्रात लोट्स टीमचा रोमन ग्रॉसजीन सर्वात वेगवान ठरला. पहिली फेरी होताच पावसाने या सत्रात अडथळा आणला.
ऑस्ट्रेलियामध्ये वेगचा हा थरार गेल्या 85 वर्षांपासून सुरू आहे. 1928 मध्ये फिलीप आयलंडमध्ये झालेली सर्वात पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रांपीपासून आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये अनेक बदल झाले आहेत.
1985मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रांपीला फॉर्मुला वनवर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी क्वॉलिफाईंग रेसचा महत्वपूर्ण दर्जा मिळाला. 1999 साली ग्रीड गर्ल्सचा समावेश झाल्यानंतर तर वेगाचा रोमांच दुप्पट झाला. 1997 मध्ये सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रांपीमध्ये या ललनांचा जलवा पाहण्यास मिळाला होता.
या ललनांच्या सौंदर्याची जबाबदारी फॉस्टर्स बिअरसारख्या ब्रँडने तर कधी क्वांटास एअरलाईन्सनेही घेतली आहे.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या ऑस्ट्रेलियाच्या ग्रीड रेसचा रंगतदार प्रवास...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.