आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय फलंदाजीचा झाला कचराः ऑस्‍ट्रेलियन प्रसारमाध्‍यमांची आगपाखड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थः ऑस्‍ट्रेलियासमोर तिस-या कसोटीमध्‍ये सपशेल लोटांगण घालणा-या टीम इंडियावर ऑस्‍ट्रेलियाच्‍या प्रसारमाध्‍यमांनी कडाडून हल्‍ला चढविला आहे. भारतीय फलंदाजी कचरा असून धोनी अतिशय ढीला कर्णधार असल्‍याची टीका करण्‍यात आली आहे.
'द ऑस्‍ट्रेलियन' नावाच्‍या वृत्तपत्राने एका लेखामध्‍ये भारतीय संघाची दयनिय अवस्‍था मांडताना लिहीले आहे की, भारतीय क्रिकेट संघाचे मजबूत स्‍तंभ आता खिळखिळे झाले आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्‍वतः खिळखिळा झाला आहे. तर ज्‍या व्‍ही.व्‍ही.एस. लक्ष्‍मणला ऑस्‍ट्रेलियाचे खेळाडू घाबरायचे, तो सपशेल अपयशी ठरला आहे. विरेंद्र सेहवागने दुहेरी शतक ठोकून ऑस्‍ट्रेलियाला येण्‍यापूर्वी गर्जना तर केली होती. परंतु, त्‍याचेही मांजर झाले आहे. त्‍याच्‍या बॅटमधूनही धावा निघाल्‍या नाही. कर्णधार धोनीची परिस्थिती यापेक्षाही खराब आहे. तो संघाला प्रेरित करु शकला नाही. तसेच त्‍याचीही फलंदाजी अतिशय सुमार झाली आहे.
टीम इंडियामध्‍ये कोणीही प्रोत्‍साहन देणारा तसेच प्रेरणादायी ठरला नाही. मैदानावरील वावर हतबल झालेल्‍या खेळाडुंप्रमाणे होता, अशीही टीका करयात आली आहे. हॅरीसने द्रविडचा त्रिफळा उडविला त्‍यावेळी मिशेल स्‍टार्क मैदानाच्‍या एका कोप-यातून धावत आला आणि अतिशय उत्‍साहात त्‍याने हॅरीसचे कौतूक केले. परंतु, उमेश यादवने पाच बळी घेतल्‍यानंतर भारतीय खेळाडुंनी फक्त हस्‍तांदोलन करुन त्‍याचा शुभेच्‍छा दिल्‍या. यावरुन भारतीय खेळाडुंमध्‍ये अनुत्‍साह होताच, शिवाय कोणाची प्रेरणाही नव्‍हती, असे या लेखात म्‍हटले आहे.
धोनीच्‍या नेतृत्त्वावरही प्रश्‍नचिन्‍ह निर्माण करण्‍यात आले आहे. धोनीचे नेतृत्त्व अतिशय सुमार दर्जाचे तसेच ढीले होते. त्‍याला संघावर नियंत्रण ठेवता आले नाही. तसेच परिस्थिती हातातून निघून गेल्‍यावर त्‍याने पावले उचलली. पर्थमध्‍ये त्‍याने इशांतला अतिशय उशीरा गोलंदाजी दिली. परंतु, तोपर्यंत वॉर्नर आणि कोवेन जोडीने 7 च्‍या सरासरीने 88 धावा काढल्‍या होत्‍या, असेही ऑस्‍ट्रेलियन प्रसार माध्‍यमांनी म्‍हटले आहे.
होय, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो- धोनी
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी
कर्णधार धोनी घेणार कसोटी क्रिकेटचा संन्‍यास?