आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी पराभवावर ऑस्ट्रेलियन मीडियाकडून जोरदार टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - हैदराबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने आपल्या टीमवर जोरदार टीका केली आहे. ‘द हेरॉल्ड सन’ तर ‘आरआयपी’ शीर्षकाने एक फोटो प्रकाशित करून श्रद्धांजलीसुद्धा वाहून टाकली. या पराभवाने ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेटच्या शेवटावर शिक्कामोर्तब होते. राजीव गांधी स्टेडियम ऑस्ट्रेलियासाठी स्मशानभूमीसारखेच ठरले. विसाव्या शतकात आपल्या दमदार खेळाने जगभर दादागिरी गाजवणारी ऑस्ट्रेलियाची टीम आता मेली आहे. या टीमच्या खेळाडूंची कथा म्हणजे ‘विकेंड अ‍ॅट बर्निस’च्या पात्राप्रमाणे झाली आहे.
हेरॉल्ड सन : अवमान..पराभवानंतर हा एकमेव शब्द उरला आहे. भारतात ऑस्ट्रेलियाने अत्यंत लाजिरवाणी कामगिरी केली. 1980 नंतर इतका अंधार प्रथमच झाला आहे. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे.
सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड : हैदराबादेतील सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना नतमस्तक करण्यात आले नाही तर त्यांनी स्वत:हून आत्मसमर्पण केले. क्लार्कला वगळता एकाही फलंदाजाला भारतीय संघाशी दोन हात करता आले नाहीत.