आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australian Open Badminton Tournament: Saina, Sindhu Won The Opening Match, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना, सिंधूची विजयी सलामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल हिने संघर्षपूर्ण सामन्यानंतर तर सिंधूने अगदी सहज विजय मिळवत ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दरम्यान, अत्यंत जोरदार संघर्ष करीत दुसर्‍या फेरीत पोहोचलेल्या तुलसीसमोर सायनाचेच आव्हान असल्याने तुलसीचा प्रवास दुसर्‍या फेरीतच संपण्याची चिन्हे आहेत.
तुलसीने अमेरिकेच्या जेमी सुबंधीवर 21 -16 ,21 -18 ने मात करून दुसरी फेरी गाठली. मात्र, आता दुसर्‍या फेरीत तुलसीसमोर सायना नेहवालचे आव्हान असेल. सायना नेहवालने पहिल्या सामन्यात चीनच्या अनसिडेड सुन यू 22 - 24 ,21 -17, 17 - 21 ने विजय मिळवला. भारताच्या पी. व्ही. सिंधूने अवघ्या 33 मिनिटांत जपानी स्पर्धक अया ओहोरीचा 21 -16 , 21-14 ने पराभव केला. भारताच्या बी. साईप्रणीतने ऑस्ट्रेलियाच्या किटवर 21-7 , 21- 11 अशी मात केली. तर एच. एस.प्रणयला 14 -21 , 18 -21 असा पराभवाचा सामना करावा लागला.