आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open: Murray , Andreas Won, Federer Lose

ऑस्ट्रेलियन ओपन : मरे, आंद्रियास विजयी; फेडररचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : मरे
मेलबर्न - सहाव्या मानांकित अँडी मरे व सिमोना हालेपने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजय संपादन केला. दुसरीकडे १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या मरेने पुरुष एकेरीच्या लढतीत पोर्तुगालच्या सोउसाचा पराभव केला. त्याने ६-१, ६-१, ७-५ अशा फरकाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिकने ग्रोथला ६-४, ७-६, ६-३ ने धूळ चारली.

फेडररचे स्वप्न भंगले
स्विस किंगसाठी शुक्रवारचा दिवस फारच दुर्दैवी ठरला. त्याला इटलीच्या बिगरमानांकित आंद्रियास सेप्पीने पराभूत केले. त्याने ६-४, ७-६, ४-६, ७-६ ने सनसनाटी विजयाची नोंद केली.
सिमोनाची आगेकूच
महिला एकेरीत सिमोना हालेपने सामना जिंकला. तिने अमेरिकेच्या बाथेनी मॅटक-सँडचा पराभव केला. तिस-या मानांकित हालेपने ६-४, ७-५ अशा फरकाने विजय मिळवला.