आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना-शारापोवाची जेतेपदासाठी झुंज! मॅडीसनचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातील नंबर वन सेरेना विल्यम व दुसरी मानांकित मारिया शारापोवा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदासाठी झुंजणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेची फायनल गाठली.
अव्वल मानांकित सेरेना विल्यमने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद केली. तिने सामन्यात आपली सहकारी मॅडीसन केयचा पराभव केला. सेरेनाने ७-६, ६-२ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह तिने अंतिम फेरी गाठली. यासाठी तिला मोठी झुंज द्यावी लागली. अमेरिकेच्या सेरेनाने चार वर्षांच्या दीर्घ मेहनतीनंतर अंतिम फेरीत धडक मारली.
मकारोवा बाहेर
दुसऱ्या मानांकित मारिया शारापोवाने अंतिम फेरी गाठली. तिने लढतीत एकतारिना मकारोवाचावर मात केली. तिने ६ -३, ६-२ ने विजय िमळवला.