आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open Tennis Tournament Sania Out Of Mixed Double

ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा- होरियाला उपविजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- भारताची सानिया मिर्झा आणि तिचा रोमनियन जोडीदार होरिया टेक्यू ही जोडी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली. या पराभवाबरोबर या जोडीला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कॅनडाच्या डेनियल नेस्टर व फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लाडेनोविक या जोडीने 3-6 आणि 2-6 असे हरविले.
गेल्या वर्षी विम्बलडनच्या उपांत्यपूर्व फेरीत सानिया आणि होरिया या जोडीला डेनियल आणि क्रिस्टीना जोडीने पराभूत केले होते. आताही याच जोडीने या दोघांना विजेतेपदापासून वंचित ठेवले. सानिया होरियासोबत 2013 च्या विम्बलडनपासून खेळत आहे.
सानिया आणि होरिया यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन पेयर जर्मिला गजदोसोवा आणि मॅथ्यू इब्डेन जोडीला 2-6, 6-3 आणि 10-2 अशी धूळ चारली होती. मात्र आज झालेल्या फायनलमध्ये या जोडीला पराभूत व्हावे लागले.
2009 साली सानियाने भारताच्याच महेश भूपतीसोबत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.