आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open Tennis Tournament: Sharapova, Nadal, Pace Entry To Next Game

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: शारापोवा, नदाल, पेस पुढच्या फेरीत दाखल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - टेनिस सुंदरी मारिया शारापोवा आणि शारीरिक व्याधींमधून सावरत खेळायला प्रारंभ केलेल्या राफेल नदाल यांनी ऑस्ट्रेलीयन ओपनमधील आगेकूच कायम राखत स्पर्धेतील रंगतदेखील कायम ठेवली आहे.

रशियाची प्रख्यात टेनिसपटू मारिया शारापोवाने चीनची प्रतिस्पर्धी पेंग शुआईचा ६- ३ , ६- ० असा पराभव करून सहजपणे पुढील फेरीत प्रवेश केला. पेंगला एकविसावे मानांकन असूनही शारापोवाने ज्या सहजतेने हा विजय मिळवला, ते पाहता तिचा फाॅर्म अत्यंत चांगला असल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले.

प्रारंभीचा सेट गमावूनही विजय : दुखापतीमधून सावरत परतलेल्या नदालला पहिला सेट खेळणे अत्यंत अवघड गेले. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्याने तो सेट गमावण्याची भीती असतानाही तो सेट त्याने ७ -५ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये त्याच्या लयीत परतलेल्या नदालने दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी केवीन अँडरसन याला ६- ३ , ६ - १ असे सहजपणे पराभूत केले.
दुसरीकडे बर्नार्ड टॉमीक याला हरवून झेक टॉमस बर्डीचने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी नदाल आणि टॉमस बर्डीच यांच्यात सामना रंगणार आहे.