आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ऑस्ट्रेलियन ब्यूटीच्या यशामागे \'भारतीय फंडा\', \'वाटर बेबी\' नावाने प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 वर्षाची एमा भारतीय योगाची खूपच मोठी फॅन आहे. तसेच आपल्या यशामागे हा भारतीय फंडा असल्याचे मानते. - Divya Marathi
22 वर्षाची एमा भारतीय योगाची खूपच मोठी फॅन आहे. तसेच आपल्या यशामागे हा भारतीय फंडा असल्याचे मानते.
स्पोर्ट्स डेस्क- रिओत होणा-या ऑलिंपिक गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाकडून स्वीमर एमा मॅकॉन सहभाग घेईल. ती येथे 5 इव्हेंट्समध्ये मेडलसाठी पाण्यात उतरेल. एमाला स्वीमिंग टॅलेंट रक्तातूनच मिळाले आहे. तिच्या पॅरेंट्सनी सुद्धा ऑस्ट्रेलियासाठी स्वीमिंग केले आहे. तिचे वडील दोन वेळा ऑलिंपियन राहिले आहेत. लोक म्हणतात, 'वाटर बेबी'...
- एमाचे म्हणणे आहे की, तिचे आई- वडिल स्वीमर असल्याने तिच्या आयुष्यातील बहुतेक वेळ पाण्याच्या आसपासच गेला.
- एमाला खूप लहान वयातच पोहण्याचा नाद लागला. त्यामुळे लोक तिला 'वाटर बेबी' म्हणतात.
- तिने वयाच्या 13 वर्षी प्रोफेशनल स्वीमिंग सुरु केले.
- एमाबरोबच तिचा भाऊ आणि बहिण सुद्धा स्वीमिंग, सर्फिंग आणि वाटर स्कीइईंग यासारख्या वाटर स्पोर्ट्सशी जोडले गेले आहेत.
- स्वीमिंगसोबतच एमाने पब्लिक हेल्थ सब्जेक्टमध्ये ग्रीफिथ यूनिवर्सिटीतून पदवी घेतली आहे.
'योग'ची दिवानी आहे एमा
- 22 वर्षाची एमा भारतीय योगाची खूपच मोठी फॅन आहे. तसेच आपल्या यशामागे हा भारतीय फंडा असल्याचे मानते.
- 2010 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या यूथ ऑलिंपिक गेम्समध्ये एमाची पहिली इंटरनॅशनल स्पर्धा होती.
- याच यूथ ऑलिंपिक गेम्सदरम्यान तिला अशी एक बाब समजली की तिचे जीवनच बदलून गेले.
- तेथे तिने पहिल्यांदा योगाचा अनुभव घेतला. ज्यामुळे तिला तिच्या आयुष्यात एक सॉफ्टनेस येण्यास मदत झाली.
- योगामुळे एमाला केवळ ऊर्जाच मिळाली नाही तर तिला एक दिशा सुद्धा मिळाली. मानसिक व शारीरिक बदलाचा तिला फायदा झाला.
- एमाचे म्हणणे आहे की, योगामुळे तिला प्रेरणा मिळाली तसेच जास्त वेळ पोहण्याची शक्ती मिळाली.
रिओत पाच प्रकारात मेडलसाठी झुंझणार-
- एमा रिओत 200 मी फ्रीस्टाइल, 100 मी बटरफ्लाय, 4*100 मी फ्रीस्टाइल रिले, 4*200 मी फ्रीस्टाइल रिले आणि 4*100 मी मेडले रिलेत सहभागी होईल.
- एवढ्या सा-या इव्हेंट्समध्ये सहभाग घेणा-या एमाचे लक्ष्य काय आहे हे लागलीच स्पष्ट होते.
स्वीमिंग अचीवमेंट्स-
- एमाने सर्वप्रथम 2010 मध्ये सिंगापुर येथे झालेल्या यूथ ऑलिंपिक गेम्समध्ये सहभाग घेतला.
- तेथे तिने एक गोल्ड आणि 2 सिल्वर सह एकून 6 मेडल जिंकली होती.
- वर्ष 2013 मध्ये तिने बार्सिलोनामध्ये झालेल्या फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल जिंकले होते.
- 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने 4 गोल्ड आणि दोन ब्राँझ मेडल जिंकली होती.
- 2015 मध्ये रशियातील कझानमध्ये झालेल्या फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडल जिंकले होते.
पुढे स्लाईड्समध्ये फोटोजमधून पाहा, या ऑस्ट्रेलियन स्वीमरची पर्सनल लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...