बई - ऑस्टेलियन क्रिकेटपटू, वेगवान गोलंदाज शॉन टॅट भारतीय मॉडेल माशूम सिंघासोबत विवाहबंधनात अडकला आहे. गेल्या 12 जून रोजी त्यानी मुंबईमध्ये विवाह केला. शॉन टॅट आणि सिंघा 2007 पासून डेटिंग करत होते. यापूर्वीही त्यांनी आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत माशुम सिघा यांनी म्हटले, की वर्षभरापूर्वी पॅरिसमध्ये शॉन टॅटने प्रपोज केले होते. त्यानंतर आम्ही दोघे सोबत राहायला लागलो. विवाहाच्यावेळी मी आंनदा काबराद्वारा डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता.
युवराज आणि जहीरखानची उपस्थिती
शॉन टॅट आणि माशूम सिंघा यांच्या विवाहाला टॅटचे ऑस्ट्रेलियन मित्र उपस्थित होते तर भारतीय क्रिकेट संघातील युवराजसिंह आणि जहीर खान सुध्दा उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा टॅट आणि सिंघाची निवडक छायाचित्रे..