आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैना पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरही अडकला विवाहाच्या बंधनात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: डेव्हिड वॉर्नर आणि केंडिस)
सिडनी- टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने बालपणीची मैत्रिण प्रियंकासोबत शुक्रवारी विवाहाचे सातफेरे घेतले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरनेही गुपचूप लग्न केले आहे. वॉर्नर आणि केंडिस फॉलजा शनिवारी विवाहबद्ध झाले. वॉर्नरने न्यू साउथ वेल्समधील एका हॉटेलमध्ये घेतलेला सेल्फी पोस्ट करून केंडिससोबत विवाह केल्याची माहिती दिली. वॉर्नर पत्नी केंडिससोबत भारतात येण्यास उत्सूक दिसत आहे.
 
 
वॉर्नर आयपीएल-8 मध्ये सनराइजर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत.

11 सप्टेंबर, 2014 ला दिला कन्येला जन्म...
डेव्हिड वॉर्नर आणि केंडिस विवाहपूर्वीच एक कन्येचे आई-वडील आहेत. केंडिस फॉलजोनने 11 सप्टेंबर, 2014 ला एका कन्येला जन्म दिला होता. वॉर्नर- केंडिसच्या आपल्या मुलीचे नाव ईव्ही मेय वॉर्नर असे आहे.
 
दोन वर्षे डेटिंग आणि 40 कोटींचा बंगला...
वॉर्नर आणि केंडिस दोन वर्षांपासून डेटिंग करत आहे. पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांत गुंतले. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला आणि स्वत:चा बंगला खरेदी केला. वॉर्नर केंडिसचे ड्रीम होम सिडनीजवळ कूजी शहरात असून या बंगल्याची किंमत 40 कोटी रुपये आहे . (6.5 मिलियन डॉलर) आयपीएल-7 मध्येही केंडिस ही वॉर्नरसोबतच होती.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, डेव्हिड वॉर्नर आणि केंडिसचे निवडक फोटो...