Home »Sports »From The Field» Austrelia Near To Win Against Sri Lanka

ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरूद्ध विजयाची संधी

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:11 AM IST

  • ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरूद्ध विजयाची संधी

सिडनी- तिस-या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या श्रीलंकेवर असा दबाव वाढवला आहे की, सामन्याच्या चौथ्या दिवशीच क्लीन स्वीपचा निकाल लागणे जवळजवळ निश्चित आहे. श्रीलंका संघाने आता अवघ्या 87 धावांची आघाडी घेतली आहे. त्यांचे सात खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. कर्णधार महेला जयवर्धनेने 60 व सलामीवीर करुणारत्नेने 85 धावा काढून धावसंख्या 200 च्या पार केली. मात्र, यामधून पराभवाला टाळता येत नाही.


ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 294 धावांच्या प्रत्युत्तरात 9 बाद 432 धावा काढल्या आणि 138 धावांची आघाडी घेतली. मॅथ्यू वेडने नाबाद 102 धावांचे योगदान दिले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशा प्रकारे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 138 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 7 गडी गमावून 225 धावा काढल्या आहेत. आता लंकेची एकूण 87 धावांची आघाडी झाली आहे, ज्यामुळे विजय मिळवणे अशक्य आहे. रविवारी तळातले फलंदाज काही तरी चमत्कार करतील, यात शंका आहे. गोलंदाजीत मिशेल जॉन्सनने दोन, मिशेल स्टार्क, जॅक्सन बर्ड, पीटर सिडल व लियोनने प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका-
पहिला डाव-294, दुसरा डाव-7 बाद 225 धावा.
ऑस्ट्रेलिया- पहिला डाव-9 बाद 432 धावा.

Next Article

Recommended