आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Austrian International Challenge 2012: K.t. Rupesh Kumar And Sanave Thomas

रूपेश-थॉमसने पटकावले ऑस्ट्रियनचे अजिंक्यपद

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएन्ना - जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानावर असलेल्या भारताच्या रूपेशकुमार व सनावे थॉमस या जोडीने अंतिम सामन्यात धडाकेबाज विजय मिळवून ऑस्ट्रियन इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या हिरोयुकी साइकी-ओहाताला 23-21, 22-20 गुणांनी पराभवाची धूळ चारून रूपेश-थॉमसने दणदणीत विजय संपादन केला.आक्रमक व चुरशीची खेळी करत भारताच्या जोडीने अवघ्या 39 मिनिटांत विजेतेपदाचा बहुमान पटकावला.
येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना रूपेश-थॉमस व साइकी-ओहाता यांच्यात रंगला. विजयी आघाडी घेत स्पर्धेतील आव्हान राखून ठेवणा-या रुपेश-थॉमस या जोडीला विजेतेपदाची प्रबळ दावेदार जोडी मानले जात होते. याच विश्वासाला कायम ठेवत रूपेश-थॉमस या जोडीने पहिल्याच सेटवर वर्चस्वाची खेळी करत 23-21 ने बाजी मारली. पहिल्या सेटवरच्या विजयासाठी जपानच्या जोडीने शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याचा रूपेश-थॉमसच्या आक्रमक खेळीसमोर फार काळ निभाव लागला नाही. याच खेळीला उजाळा देत रूपेश-थॉमसने दुस-या सेटवर 22-20 ने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले.
पोलंडच्या वाचा पजेमस्लावला विजेतेपद - पुरुष एकेरीच्या लढतीत शानदार विजय मिळवून पोलंडच्या वाचा पजेमस्लावने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात यिहानला 14-21, 21-15, 21-16 ने पराभूत केले.
महिला दुहेरीत मलेशियाची सरशी - महिला दुहेरीच्या लढतीत मलेशियाच्या हुई-लीन या जोडीने बाजी मारली. इवा लिपा उला-लियन ओबान्नाचा 21-16, 21-18 ने दारुण पराभव करत हुई-लीनने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.