आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाने दुस-या वनडेतही वेस्ट इंडीजला नमवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ - जॉजे बेअलीचे (नाबाद 125) शतक आणि मिशेल स्टार्कच्या पाच विकेटच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुस-या वनडेत वेस्ट इंडीजला 54 धावांनी नमवले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 266 धावा काढल्या. यानंतर यजमानांच्या गोलंदाजांना वेस्ट इंडीजला 212 धावांवर रोखून दमदार विजय मिळवला.

धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात चांगली झाली. स्फोटक क्रिस गेल अवघ्या 4 धावा काढून बाद झाला. रामनरेश सरवन (0), डॅरेन ब्राव्हो (14), ड्वेंन ब्राव्हो (45), केरोन पोलार्ड (1), डी. थॉमस (0) आणि डॅरेन सॅमी (8) हे फलंदाज लवकर बाद झाले. विंडीजकडून सलामीवीर केरोन पॉवेलने एकाकी झुंज देताना 83 धावा काढल्या. त्याने 90 चेंडूंत 2 षटकार आणि 10 चौकार मारले. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 8 षटकांत एक निर्धाव टाकताना 32 धावांत 5 गडी बाद केले. मॅक्सवेलने चौघांना टिपले.

तत्पूर्वी, जॉर्ज बेअलीच्या नाबाद 125 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 266 धावांचा सन्मानजनक स्कोअर गाठला. ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात चांगली झाली नाही. ऑ स्ट्रेलियाने 93 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या.
यानंतर बेअलीने एका टोकाने झुंजार फलंदाजी केली. त्याने 110 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 125 धावा काढल्या. इतरांनी निराशा केली. विंडीजकडून डॅरेन सॅमीने 3 तर केमर रोच, होल्डर, ब्राव्हो आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक- ऑस्ट्रेलिया 266. (जॉर्ज बेअली 125, फुल्कनर 39, 3/48 सॅमी) वि.वि. वेस्ट इंडी ज 212.(पॉवेल 83, ब्राव्हो 45, 5/32 स्टार्क, 4/63 मॅक्सवेल).