आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Austrilia Open; Yokovic ,ferrer,bardich,almagro Win

ऑस्ट्रेलियन ओपन । योकोविक, फेरर, बर्डिच, अलमाग्रो विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - रशियन स्टार मारिया शारापोवा, पोलंडची एग्निजस्का रंदावांस्का यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम ठेवली आहे. दोघींनी रविवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दुसरी मानांकित शारापोवाने चौथ्या फेरीत बेल्जियमच्या कर्सटेन लिपकेंसला 6-1, 6-0 ने हरवले. चौथी मानांकित रंदावांस्काने 13 वी मानांकित सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविचला 6-2, 6-4 ने मात दिली. चौथ्या फेरीतच चीनच्या ली नाने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जिसला 7-6, 6-1 ने आणि रशियाच्या एकतेरिना मकारोवाने जर्मनीच्या एंजलिक कर्बरला 7-5, 6-4 ने हरवले.

पुरुष एकेरीत चौथा मानांकित डेव्हिड फेरर आणि पाचवा मानांकित थॉमस बर्डिच तसेच दहावा मानांकित निकोलस अलमाग्रोने उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या फेरीत स्पेनच्या फेररने जपानच्या केई निशिकोरीला 6-2, 6-1, 6-4 ने मात दिली. चेक गणराज्याच्या बर्डिचने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनला 673, 6-2, 7-6 ने पराभूत केले. सर्बियाचा जांको टिप्सेरेविचने माघार घेतल्याचा फायदा स्पेनच्या निकोलस अलमाग्रोला झाला. आठवा मानांकित टिप्सेरेविचने सामन्यातून माघार घेतली त्या वेळी अलमाग्रो 6-2, 5-1 ने पुढे होता.
भूपती-पेत्रोवा दुस-या फेरीत
भारतीय स्टार महेश भूपती आणि त्याची महिला जोडीदार रशियाची नादिया पेत्रोवा यांनी मिश्र दुहेरीत दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. पाचवी मानांकित भूपती-पेत्रोवा जोडीने हॉलंडचा जीन ज्युलियन रोजर आणि ऑ स्ट्रेलियाची अनास्तासिया रोडिनोवा यांना 6-4, 6-2 ने हरवले.
शारापोवाची विक्रमी कामगिरी
2008 ची चॅम्पियन शारापोवाने या स्पर्धेत आतापर्यंत विक्रमी कामगिरी केली आहे. तिने स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात तिने केवळ पाच गेम गमावले. सर्वात कमी गेम गमावून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा तिने रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत 8 गेम हरण्याचा विक्रम मोनिका सेलेस (1991, 1993) आणि स्टेफी ग्राफ (1989) यांच्या नावे होता.
योकोविकचा संघर्षमय विजय
जगातला नंबर वन आणि सर्बियाचा नोवाक योकोविकने चौथ्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्याने स्वित्झर्लंडचा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असलेल्या एस. वावरिंकाला हरवले. पाच सेटमध्ये विजय मिळवला. त्याने ही लढत 1-6, 7-5, 6-4, 6-7 (5-7), 12-10 ने जिंकली. वावरिंकाने पहिला आणि चौथा सेट जिंकून योकोविकसाठी धोका निर्माण केला होता. मात्र, सर्बियाच्या खेळाडूने अनुभवाच्या बळावर बाजी मारली.