आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन : योकोविक, शारापोवा विजयी व्हीनस विल्यम्सचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - नोवाक योकोविक, जांको टिप्सारेविच, मारिया शारापोवा व चौथ्या मानांकित एग्निजस्का रांदावस्काने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. भारताची सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीत बॉब ब्रायनसोबत मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. सानिया-ब्रायनने स्टोसूर-ल्युकला सेविलेवर 6-2, 6-2 ने मात केली.

सलग तिस-यांदा किताब जिंकण्याचा प्रयत्न करणा-या योकोविकने पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत स्तेपानेकला 6-4, 6-3, 7-5 ने हरवले. जगात 34 व्या स्थानी असलेल्या स्तेपानेकने रोमांचक लढतीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र, सर्बियाच्या खेळाडूसमोर त्याचा निभाव लागला नाही. योकोविकने सुरेख सर्व्हिस व कोर्टवरील चमकदार कामगिरीच्या बळावर चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.त्याचा पुढचा मुकाबला आता अमेरिकेच्या सॅम क्वेरी व स्विसचा स्टॅनिसलास वावरिंका यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत होईल.

पुरुष एकेरीच्या दुस-या सामन्यात दहाव्या मानांकित निकोलस अलमार्गोने 24 व्या मानांकित जर्जी जॅकोविजला 7-6, 7-6, 6-1 ने धूळ चारली. या विजयासह स्पेनच्या खेळाडूने चौथ्या फेरीत धडक मारली. याशिवाय आठव्या मानांकित यांको टिप्सारेविचने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात 32 व्या मानांकित ज्युलियन बेनेटिआयुला 3-6, 6-4, 2-6, 6-4, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या थरारक लढतीत फ्रान्सच्या ज्युलियनला अवघ्या दोन सेटमध्ये बाजी मारता आली.
केर्बरने अमेरिकेच्या मॅडिसनला 6-2, 7-5 ने हरवले. ली नाने सोराना सर्सटियाला 6-4, 6-1 ने पराभूत केले.