आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 91 धावांनी विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कटक - गतविजेता ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषकमध्ये दमदार सुरुवात करताना शुक्रवारी पाकिस्तानवर 91 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 175 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकने अवघ्या 84 धावांवर गाशा गुंडाळला. या सामन्यात सारा कोएट सामनावीरची मानकरी ठरली.

साराची अष्टपैलू कामगिरी
पाच वेळचा चॅम्पियन ऑ स्ट्रेलियाला 46.1 षटकात अवघ्या 175 धावा काढता आल्या. यामध्ये सामनावीर सारा कोएटने (नाबाद 35 धावा, 20 धावांत तीन विकेट) अष्टपैलू कामगिरी केली. तसेच पाककडून बिस्मा महरुफने सर्वाधिक 43 धावा काढल्या. मात्र, पाकच्या इतर महिला खेळाडू एकेरी धावांवर बाद झाल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅलिस पैरीने 18 धावा देत 2 बळी घेतले आणि लिसा स्थळेकरने 19 धावात दोन गडी बाद केले. हाली फर्लिंगने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- 175 धावा , पाक -84 धावा.