आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन संघ भारतात तीन तुकड्यांमध्ये येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - चार कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने तीन तुकड्यांमध्ये भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील हवामान व खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याकरिता येत्या गुरुवारी (7 फेब्रुवारी रोजी) 8 खेळाडूंचे पहिले ऑस्‍ट्रेलियन पथक दाखल होईल. कर्णधार मायकल क्लार्क, शेन वॉटसन, डोहर्ती, मिशेल स्टार्क, ह्युजेस, जॉन्सन हे खेळाडू 11 फेब्रुवारी रोजी भारतात येण्यासाठी निघतील.