आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auther Removed From Australian Cricket; Lehman New Coach

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून ऑर्थरची हकालपट्टी; लेहमन नवे कोच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडने - इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिका सुरू होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने राष्‍ट्रीय संघाचे दक्षिण आफ्रिकन कोच मिकी ऑर्थर यांची हकालपट्टी केली आहे. ऑर्थर यांच्या जागी डॅरेन लेहमन यांची नियुक्ती करण्यात आली.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुंदरलँड यांच्यासोबत ब्रिस्टल येथे झालेल्या बैठकीनंतर आफ्रिकेच्या ऑर्थर यांना पदावरून दूर करण्यात आले. एका सूत्राने ही माहिती दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली की सुदरलॅँड आणि हावर्ड एकत्रित एक पत्रकार परिषद आयोजित करणार असून, यात ऑस्ट्रेलिया संघाच्या कोचिंग पद्धतीबद्दल माहितीदेखील या वेळी दिली जाईल.


ऑर्थर कोच असताना ऑस्ट्रेलियाची कामगिरी : ऑर्थर प्रशिक्षकपदी कार्यरत असताना ऑस्ट्रेलियाने 19 कसोटी सामने खेळले. यातील 10 मध्ये विजय आणि सहामध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलियन टीम आता क्रमवारित चौथ्या स्थानी घसरली आहे.


यामुळे ऑर्थर यांना मिळाला नारळ
ऑर्थर यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत मार्च 2015 पर्यंत करार होता. ऑस्ट्रेलियाचे पहिले विदेश कोच ऑर्थर यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुमार कामगिरी आणि संघात शिस्त नसल्याचा फटका त्यांना बसला.