आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Autrilia Dominat On One Day Series Against West Indies

ऑस्ट्रेलियाचे वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेवर वर्चस्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - पाचवा व शेवटचा सामना 17 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने रविवारी वेस्ट इंडीजविरुद्धची वनडे मालिका 5-0 ने खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी 5 गडी गमावून 274 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या विंडीजचा डाव 257 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाचा वोग्स सामनावीर व स्टार्क मालिकावीरचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करणा-या विंडीजची चांगली सुरुवात झाली नाही. दुस-या षटकात सलामीवीर पॉवेल (2) जॉन्सनच्या चेंडूवर फिंचकरवी झेलबाद झाला. तिस-या क्रमांकावर आलेल्या डॅरेन ब्राव्होने चार्लसला महत्त्वाची साथ दिली.या दोघांनी दुस-या गड्यासाठी 111 धावांची भागीदारी केली. चार्लसने 121 चेंडूंत 8 चौकार व एक षटकार ठोकून 100 धावा काढल्या. दरम्यान, डोहर्तीने ब्राव्होला (33) झेलबाद करून जोडीला फोडले. त्यापाठोपाठ डी. ब्राव्होला (13) जॉन्सनने त्रिफळाचीत केले. पोलार्डने संघाची बाजू सावरत 62 चेंडूंत 45 धावा काढल्या. त्यानंतर तळातले फलंदाज स्वस्तात बाद झाले. गोलंदाजीत मॅकीने 52 धावा देत तीन व जॉन्सनने 50 धावा देत तीन बळी घेतले. फुल्कनेर, डोहर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.