आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayaj Meman Article About India Vs South Africa Test Match

डिव्हिलर्सच्या यशासाठी प्रतिस्पर्धीही करतात प्रार्थना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान क्रिकेटपटूला प्रत्येक ठिकाणी मानाचे स्थान आणि प्रेमही मिळते. मात्र, काही अपवादात्मक असेही आहेत, ज्यांच्या चाहत्यांना कोणतीही सीमा नाही. त्यांच्या चाहत्यांची किनार ही देशाची सीमारेषा पार करून दुसऱ्या देशात आपली ओळख निर्माण करते. जगभरात त्यांची कीर्ती पसरते. मला माझ्या सुरुवातीच्या जीवनातील एक सामना आठवतो. ही गोष्ट १९६६-६७ मधील ब्रेबॉर्न स्टेडियमवरील एका कसोटी सामन्याची आहे. वेस्ट इंडीजचा गारफील्ड साेबर्स फलंदाजीसाठी आल्यावर खचाखच चाहत्यांनी भरलेल्या या स्टेडियमवर सगळीकडे शांतता पसरली. त्यानंतर चाहत्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागतही केले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी त्या फलंदाजाच्या चालण्यावर आपली नजर ठेवली. त्यामुळे सामना पाहताना मी अडचणीत सापडलो. कारण हा फलंदाज बाद व्हावा अशी कोणत्याही चाहत्याची इच्छा नव्हती. हा भारतीय संघासाठी अधिक धोकादायक आहे हे माहिती असूनही चाहत्यांमध्ये हा उत्साह कायम होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सरस खेळी करणाऱ्या सोबर्सच्या प्रेमात सामन्यानंतर मीही पडलो. त्यामुळे टीम इंडियाचा विजय व्हावा, असे मनात असले तरीही सोबर्सने चांगली खेळी करावी, असे मनोमन वाटत होते.

सर ब्रॅडमॅन, इम्रान खान, व्हिव्हियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, डेनिस लिली, शेन वॉर्नसारखे असेही काही दिग्गज आहेत, ज्यांच्या प्रती चाहत्यांच्या मनात अशी आदराची भावना आहे. यामध्ये अजूनही काही दिग्गजांचा समावेश करता येईल.

यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्सही सहभागी झाला. जन्मस्थान असलेल्या प्रिटोरियाच्या स्टेडियमवर होणारा जल्लोष हा बंगळुरूच्या मैदानावर डिव्हिलर्स उतरल्यावर झाला. हा या खेळाडूप्रती असलेला चाहत्यांच्या मनातील आदरभाव होता.
ही डिव्हिलर्सची करिअरमधील १०० वी कसोटी आहे. तो आयपीएलमध्ये बंगळुरू टीमकडून खेळतो. यशस्वी होताना पाहिल्या जाणाऱ्या खेळाडूच्या प्रती हा आदर दिसून आला. या खेळाडूंना आपल्या लोकप्रियतेचा कधीही गर्व नसतो. केन बॅरिग्टन आणि टोनी ग्रेगदेखील भारतामध्ये लोकप्रिय होते. मात्र, मैदानावर ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी खेळी करत होते. तसेही हा ओळखीचा आवाज वाटत होता. कारण या जल्लोषानंतरच डिव्हिलर्सला मोठ्या खेळीची प्रेरणा मिळते. धर्मशाला, मोहाली, जोहान्सबर्ग, हेडिंग्ले, सिडनीसारख्या मैदानावर उतरल्यावर त्याचे जल्लोषात स्वागत होते. डिव्हिलर्स अशा क्लबचे प्रतिनिधित्व करतो, ज्याच्या कर्तृत्वाचा डंका जगभरात घुमतो. प्रतिस्पर्धी टीमही त्याच्या यशासाठी प्रार्थना करतात. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एड स्मिथने एबीच्या बाबतीत सकारात्मक अशी टीका केली. ‘सर्व गुणांनी परिपूर्ण असलेला डिव्हिलर्स हा खेळाडू आहे. आपण कल्पना करत असलेली सर्वच फटकेबाजी तो करत असल्याचे दिसते. तसेच आपल्याला कल्पनाही नसलेली खेळी करण्यात तो तरबेज आहे. आक्रमकपाठोपाठच विनम्र असलेल्या या फलंदाजाची प्रतिस्पर्धी टीमही प्रशंसा करते. रोमांच हा त्याच्या प्रत्येक फटकेबाजीमध्ये असतो. हेच त्याने बंगळुरू कसोटीत सिद्ध केले. त्याने या ठिकाणी टीम इंडियाच्या फिरकीपटूंना चोख प्रत्युत्तर देत तुफानी फटकेबाजी केली. त्याने केलेली ८५ धावांची खेळी कौतुकास्पद ठरली. त्यामुळेच तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे दिसून येते. सर्वच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर एकाकी झुंज देत त्याने टीमच्या धावसंख्येला गती दिली.