आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा अधिक बळी घेतल्यानंतर जहीर खानने निवृत्ती घेतली. तो कपिलदेवनंतर भारताचा सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला. काही जण श्रीनाथचे नाव घेऊ इच्छित असतील, हे मला माहिती आहे. मात्र, जहीरकडे असलेली रिव्हर्स स्विंगची क्षमता श्रीनाथकडे नव्हती. श्रीनाथ स्विंग चांगला करायचा. मात्र, एकूण गोलंदाजी कुशलतेमध्ये जहीर त्याच्यापेक्षा उजवाच ठरला. जहीरकडे कपिलसारखी स्विंग, कट व सीमची क्षमता होती. त्याच्या कारकीर्दीचे आकडे पाहिले तर त्याने देशासाठी शानदार योगदान दिल्याचे दिसून येते. कपिलने ४३४ कसोटी विकेट, तर जहीरने ३११ कसोटी विकेट घेतल्या. कपिलची सरासरी २९.६४, तर जहीरची ३२.९४ अशी होती. या दोघांचे प्रदर्शन यामुळे प्रशंसनीय आहे, कारण आशिया खंडातील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर या दोघांनी फक्त जिवंत गोलंदाजी करून विकेट घेतल्या नाही, तर टीमच्या विजयात खास भूमिकाही पार पाडली. संथ खेळपट्टीवर त्यांच्या गोलंदाजीतील विविधता, नियंत्रण, अचूक टप्पा आणि लाइन व लेंथ असे सर्व मिळून वेगवान गोलंदाजीची संपूर्ण क्षमता दोघांकडे होती. तंत्र व संयमाच्या बाबतीत दोघेही लाजवाब होते. भारतीय गोलंदाजांत सचिन जहीरला सर्वाधिक चतुर गोलंदाज मानतो, तर सुनील गावसकर यांचे मत कपिलच्या बाजूने आहे.
कपिल श्रेष्ठ अष्टपैलूंत गणला गेला. जहीरनेही क्रिकेट जीवनाच्या उत्तरार्धात तळाला चांगली फलंदाजी केली. एकदा तर त्याने ७५ धावांची खेळीसुद्धा केली होती. कपिल व जहीर दोघांचे सुप्रीम फिटनेस नव्हते. कपिल खांद्यामुळे, तर जहीर गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. हे दोघे पूर्ण फिट असते तर भारताच्या विजयाची संख्या वाढली असती. दुखापतीनंतरही कपिल खेळत होता, तर जहीर संघातून आत-बाहेर होत राहिला. जहीरला कुंबळे व हरभजनसारख्या विश्वविख्यात फिरकीपटूंची साथ लाभली.
आजचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसुद्धा जहीरचा प्रशंसक आहे. धोनीने जहीरला गोलंदाजांतील सचिन तेंडुलकर मानले. धोनी नेहमी सामन्यादरम्यान सचिन आणि जहीरसोबत रणनीतीशी संबंधित सल्ला घेत होता. जहीरने सोबतच्या गोलंदाजांना कधीच स्पर्धक मानले नाही. उलट तो युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करायचा. बीसीसीआयने तर त्याला संघात असताना युवा गोलंदाजांचा मेंटर घोषित केले होते.
२००७ ते २०११ हा कालावधी जहीरसाठी गोल्डन होता.
टीम इंडियाच्या क्रमावारीत त्या काळात सुधारणा झाली. वर्ल्डकप जिंकण्याची कमालही केली. जहीरने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक २१ बळी घेतले. त्याने २००३ मध्येसुद्धा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवण्यात खास योगदान दिले होते. त्या वेळी तो नवा व कमी अनुभवी होता. मात्र, आठ वर्षांनंतर परिपक्व बनून त्याने पुढे २१ बळी घेतले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. तेथे लॉर्ड््स कसोटीच्या वेळी जहीरला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले. यातून तो सावरू शकला नाही. त्यासाठी त्याने मेहनत घेतली. मात्र, त्याच्या शरीराने साथ दिली नाही. अखेर जहीर २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नाही. १८ षटकांच्या गोलंदाजीचे ओझे माझे खांदे आता उचलू शकत नाही, हे जहीरने स्वत: घोषित केले. यामुळे त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. जहीरने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो बरेच दिवस टीम इंडियातून दूर राहिला. मात्र, त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. जहीरने गोलंदाजी कोच बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीसीसीआयने थोडाही वेळ न गमावता त्याला तत्काळ गोलंदाजी कोच बनवले पाहिजे. बीसीसीआय असेच करेल, अशी आशा आहे.