आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विशेष: खेळाडूंच्या अपयशाकडे दुर्लक्ष धोकादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. याला आमचेही पूर्ण सर्मथन आहे. या स्पष्टीकरणासाठी बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना शेवटी किती महत्त्व द्यायला हवे, हा अनुत्तरित प्रश्न आहे. मागील अनेक दिवसांपासून बीसीसीआयच्या नियमित बैठकांतून कोच फ्लेचर हसत खेळत बाहेर परतले आहेत. सर्मथनाचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, जर विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतही टीम इंडियाने लाजिरवाणी कामगिरी केली, तर सूर यापेक्षा वेगळा नक्कीच असेल. गेल्या काही दिवसांपासून 65 वर्षीय फ्लेचर हे टीकेच्या तोंडी आहेत. सुनील गावसकरांनी प्रशिक्षक पदावरून हकालपट्टीची मागणी करताच डंकन फ्लेचर यांच्यावरचा दबाव चांगलाच वाढला. माजी कर्णधाराने फ्लेचर यांच्यावरच नव्हे तर, विदेशी कोचच्या आवश्यकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच प्रशिक्षकपद युवा खेळाडूकडे सोपवण्यात यावी. तसेच विदेशी कोच टीम इंडियाचा दर्जा उंचावू शकत नाही, असा इशारा गावसकर अनेक दिवसांपासून देत आहेत. त्या जागी भारताचे माजी खेळाडू चांगले योगदान देऊ शकतील, असा दावादेखील गावसकरांनी केला. यासाठी त्यांनी राहुल द्रविडसह सचिन, लक्ष्मण आणि अनिल कुंबळेलाही पसंती दर्शवली आहे. त्यांच्या मते, बाहेरील व्यक्ती राजकीय हस्तक्षेप करत नाही.
शेवटी विदेशी कोच कसा निष्पक्ष असेल? नुकत्याच झालेल्या दोन कसोटी मालिकांचे उदाहरण घ्या. इंग्लंडने भारतात यजमान टीम इंडियाला नमवून 2012-13 मध्ये अँशेस सिरीज आपल्या नावे केली. त्या वेळी विदेशी कोच अँडी फ्लॉवरवर कौतुकाचा मोठय़ा प्रमाणात वर्षाव करण्यात आला. मात्र, 2013-14 मध्ये इंग्लंडच्या अँशेस मालिकेतील पराभवाचे खापरही कोचच्या माथी फोडण्यात आले. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलिया पराभूत झाला आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मिकी ऑर्थरची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी केली. त्या जागी आपल्या देशाचे डॅरेन लेहमन यांची नियुक्ती केली. त्यामुळे टीमचा मोठय़ा प्रमाणात कायापालट झाला. यातूनच ऑस्ट्रेलिया टीम विजयी ट्रॅकवर परतली.
भारतीय संघाच्या विदेशी कोचच्या बाबतीत विचार केल्यास हे सर्व काही मिळतेजुळते आहे. जॉन राइट आणि गॅरी कस्र्टनला चांगले यश मिळाले. ग्रेग चॅपेल आणि डंकन फ्लेचर (आतापर्यंत) फ्लॉप ठरले आहेत. म्हणजे प्रकरण अध्र्यास अर्धे झाले.
सध्या खेळाच्या बाबतीत माझे काही प्रश्न आहेत. हे देशी आणि विदेशी कोचसाठी फार महत्त्वाचे आहेत. कोणत्याही संघासाठी रिझल्टपेक्षाही त्याचे भविष्य किती उज्ज्वल आहे, हे अधिक महत्त्वाचे असते. मी गावसकरांच्या मागणीचे पूर्णपणे सर्मथन करतो. अत्याधुनिक क्रिकेटमध्ये कोच आणि खेळाडू यांच्यात जवळचे नाते असावे. वयाचे अंतरही यासाठी कमी असावे. याद्वारे कोच खेळाडूंच्या तांत्रिक आणि मानसिक बाजू सहज समजून घेऊ शकेल.
गावसकरांनी तर नव्या कोचसाठी राहुल द्रविडच्या नावाचाही सल्ला दिला. तो यासाठी फिट आहे. तसेच खासकरून वादविवादापासूनही दूर आहे. त्याच्या निर्णयाचे सर्वच जण पालन करतात. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना त्याने मेंटरचीही भूमिका यशस्वीपणे बजावली आहे. नुकतेच त्याने वेळ नसल्याचे कारण पुढे करून ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र यादरम्यान त्याने दोन गोष्टी सांगितल्या. ज्या कोचसाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणाला की, 19 वर्षांखालील आणि इंडिया ए संघासोबत वेळ घालवायला मला आवडेल. मी क्रिकेट करिअरमधील अनेक अनुभव त्यांच्यासोबत शेअर करू शकेल. यातूनच स्पष्ट होते की, खेळाडू आणि प्रशिक्षकांमधील वयात फारसे अंतर नसावे. त्यामुळे त्याने केलेले मार्गदर्शन अधिक प्रभावशाली ठरेल. सीनियर कोच हे खेळाडूंना केवळ प्रशिक्षण देऊ शकतात. मात्र, त्याचा कितपत परिणाम खेळाडूंवर होईल, हे अस्पष्ट असते. तसेच राहुल द्रविड म्हणाला की, टीमचे भविष्य हे खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते. हे अनुभवाचेच बोल आहेत. यातून कोणत्याही विदेशी कोचला परिणामाशिवाय मोठी रक्कम देणे चुकीचे ठरेल. मात्र, कोचवर अतिरिक्त जबाबदारी टाकून खेळाडूंच्या अपयशाकडे केलेले दुर्लक्ष हे अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकते.