आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाडमुठेपणा बीसीसीअायला पडला महागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाेढा समितीच्या शिफारशी अाणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात सध्या जाेरदार वाद सुरू अाहे. हा सामना जसजसा शेवटच्या टप्प्यात पाेहोचत अाहे तसतसे बीसीसीअायला टीका अाणि अडचणींचा सामना करावा लागत अाहे. सर्वाेच्च न्यायालयानेही अापला निर्णय १७ अाॅक्टाेबरपर्यंत पुढे ढकलला अाहे. सध्या केलेल्या प्रचंड टीकेमुळे सर्वाेच्च न्यायालय बीसीसीअायला संधी देण्याच्या तयारीत नाही.

न्यायालयाने मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना स्वत:ला निर्दाेष असल्याचे सिद्ध करण्याचे सांगितल्याने बीसीसीअायवर माेठ्या प्रमाणात बदनामीची नामुष्की अाेेढवली अाहे. कारण अायसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना बीसीसीअायची प्रतिमा उंचावणारे भाष्य करण्याचे ठाकूर यांनी सांगितले हाेते. वेळेत शिफारशी लागू न केल्यामुळे न्यायालयाने बीसीसीअायला चांगलेच अडचणीत अाणले अाहे. न्यायालयाकडून मिळालेल्या वेळेच्या सवलतीचा बीसीसीअायला फायदा करून घेता अाला नाही. काही शिफारशी लागू करणे कठीण अाहे. मात्र, याची स्पष्टाेक्ती न्यायालयात करण्यात मंडळ अपयशी ठरले. त्यामुळेच बीसीसीअायच्या समाेर अडचणी वाढत अाहेत. २०१३ मधील अायपीएल वादानंतर न्यायालयाने मंडळाच्या कारभाराकडे लक्ष घातले. मात्र, तरीही बीसीसीअायने अापल्या कारभारात पारदर्शकता अाणली नाही. ते अापल्याच भूमिकेवर ठाम हाेते.

गतवर्षी मंडळाचे तीन अध्यक्ष झाले. याच कारणामुळे मंडळाला याेग्य प्रकारे शिस्त लावण्याचे समाेर अाले. न्यायालयाची भूमिका लक्षात घेण्यात मंडळ पूर्णपणे अपयशी ठरले. ‘एक राज्य, एक मत’ यावर सुनील गावसकर, कपिलदेव अाणि रवी शास्त्री यांची वर्षभरापूर्वीची भूमिका महत्त्वाची ठरली असती. अाता त्यांच्या मताला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे न्यायालयाने अाक्रमक भूमिका घेतली अाहे.

अद्याप तर्कात काेणत्याही प्रकारचा विश्वसनीय बदल झाला नाही तर येत्या १० दिवसांच्या वेळेत बीसीसीअाय फारसे काहीही करू शकणार नाही. त्यामुळे न्यायालयाच्या सर्व शिफारशी मंडळाला लागू कराव्या लागतील. सुमार प्रशासनामुळे अाधीच बीसीसीअाय टीकेला सामाेरे जात असताना दुसरीकडे टीम इंडिया कसाेटीच्या क्रमवारीत नंबर वन झाली अाहे, हा एक वेगळाच याेगायाेग जुळून अाला अाहे.

अयाज मेमन
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...