आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळेचीच निवड करायची होती तर नाटक कशाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर तीन आठवड्यांच्या नाटकावर पडदा पडला आणि अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षक बनला. मुख्य कोच कोण बनणार, यावर तीन आठवडे क्रिकेटप्रेमी अंदाज लावत बसले होते. त्या वेळी कुंबळे शर्यतीत सामील होईल, असे कुणालाही वाटले नाही. अखेर रवी शास्त्री यांना मागे टाकून कुंबळेने बाजी मारली. राष्ट्रीय संघाचा कोच होणे हे सर्वात सन्माननीय आणि आव्हानात्मक आहे. देशात सर्वत्र क्रिकेटचे वेड असल्याने ते आव्हानात्मक आहे.

मुख्य कोचच्या निवडीसाठी बीसीसीआयने प्रथमच सर्व प्रक्रियेचे पालन केले. मुख्य कोचसाठी जाहिरात देण्यात आली. त्यासाठी अटीही ठेवण्यात आल्या. हिंदीचे ज्ञान असले पाहिजे ही त्यातील एक महत्त्वाची अट होती. याआधी कपिलदेव, जॉन राइट, गॅरी कर्स्टन, ग्रेग चॅपल, रवी शास्त्री हेड कोच बनले. मात्र, त्यांची निवड प्रक्रिया सामान्य पद्धतीने झाली. अनिल कुंबळेची निवड ज्या पद्धतीने झाली, त्यामुळे मी चकित आहे. तो शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या २१ जणांत सामील नव्हता. मात्र, त्याचे आगमन अत्यंत नाट्यमयरीत्या झाले. कुंबळेची निवड म्हणजे कोणत्याही प्रकारचा वाद किंवा बीसीसीअायचे अंतर्गत राजकारण नाही. कुंबळे सन्माननीय असून त्याचे यश स्तुती करावी तेवढे कमी आहे. त्याच्या निवडीच्या पद्धतीवर चर्चा व्हायला हवी. कुंबळेचीच निवड करायची होती तर मग जाहिरात देण्याचे नाटक का करण्यात आले? याआधी जशी कोचची थेट निवड होत होती, तशीच या वेळीही करता आली असती. बीसीसीआयने क्रिकेटची ित्रमूर्ती सचिन-गांगुली-लक्ष्मण यांच्यावर कोचच्या निवडीची जबाबदारी सोपवली. बीसीसीआयची हेड कोच निवडण्याची पद्धत मला आवडली नाही. कुंबळे आणि राजपूत यांनी कोलकात्यात उपस्थित राहून प्रेझेंटेशन आणि मुलाखती दिल्या. तर काहींनी स्काइप आणि दूरध्वनीद्वारे मुलाखती दिल्या. मुलाखतीच्या वेळी सल्लागार समितीतील तेंडुलकरही हजर नव्हता. शास्त्री थायलंडमध्ये असणे आणि त्यांच्या मुलाखतीच्या वेळी गांगुली हजर नसणेही चुकीचे आहे. हे सर्व पारदर्शक आहे असे आपण कसे म्हणू शकतो?

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला कामात पारदर्शकता ठेवण्याची सूचना केलेली आहे. मात्र, त्याचे पालन झाले नाही. असो. मनमानी प्रक्रिया का असेना, कुंबळेकडे ही जबाबदारी देण्यात आली. मात्र, त्याला केवळ एक वर्षाचा कार्यकाळ का देण्यात आला, हे लोकांना समजून घ्यायचे आहे. कोणत्याही योजनेवर काम करण्यासाठी प्रदीर्घ योजना आणि कोचला भरपूर संधी द्यायला हवी. कुंबळेचे प्रेझेंटेशन पाच वर्षांच्या योजनेवर आधारित होते. बीसीसीआय कुंबळेला किमान २०१९ च्या वर्ल्डकपपर्यंत प्रशिक्षणाची संधी देईल, अशी आशा करूया.

अयाज मेमन
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...