आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. अश्विन, लोकेश राहुल टीम इंडियाचे शक्तिस्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियानेनुकतीत यजमान वेस्ट इंडीजविरुद्धची कसाेटी मालिका २-० ने जिंकली. या मालिकेत प्रतिभा, तांत्रिक, धाडस, शिस्त अाणि महत्त्वाकांक्षेची परीक्षा घेण्यात अाली. भारतीय संघ हा यात विंडीजवर वरचढ ठरला. क्रिस गेल, डॅवेन ब्राव्हाे, अांद्रे रसेल अाणि सुनील नरेनच्या अनुपस्थितीत विंडीजचा संघ दुय्यम दर्जाचा दिसून अाला. त्यामुळे टीम इंडियाचा तुलनात्मक अभ्यास त्याच वेळेस करण्यात यावे, ज्या वेळी विंडीज संघात अाघाडीचे खेळाडू सहभागी असतील. तरीही भारताने यंदाच्या सत्रात १३ पेक्षा अधिक कसाेटी सामने खेळले अाहेत. विंडीज दाैऱ्यानंतर अाता मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे, कर्णधार विराट काेहली अाणि निवड समितीचे सदस्य टीमच्या संरचनेबाबत चर्चा करतील. यात चेतेश्वर पुजारा अाणि शिखर धवनच्या कसाेटी भवितव्याबाबत नक्कीच चर्चा करतील. याशिवाय जखमी मुरली विजयही यात चर्चेचा विषय असेल. लाेकेश राहुलच्या उदयानंतर टीममधील सलामी जाेडीविषयी विचार केला जाईल. कर्णधार काेहली हा शमी अाणि भुवनेश्वरच्या पुनरागमनाने खुश हाेईल. याशिवाय अमित मिश्रा अाणि रवींद्र जडेजाचे काैतुक करेल. काेहलीला अजिंक्य रहाणे हा भरवशाचा फलंदाज अाणि साहा यष्टिरक्षक/फलंदाजाच्या भूमिकेत धाेनीचा याेग्य पर्याय वाटला असेल.

काेहली ब्रिगेडमधील दाेन स्टार हे टीममधील शक्तिस्थान म्हणून उदयाला अाले अाहेत. यात अश्विन अाणि लाेकेश राहुलचा समावेश अाहे. विंडीज दाैऱ्यापूर्वी,अश्विनच्या नावे विदेशात सुमार कामगिरीची नाेंद हाेती. मात्र, विंडीजमध्ये त्याने कमालीचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने गाेलंदाजीशिवाय सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दाेन शतकेही ठाेकली. नवीन कसाेटी स्टार लाेकेश राहुलचे काैतुक करावे तेवढे कमीच अाहे. त्याला आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये कधीही स्थान मिळवता अाले नाही. अाकड्यात माेजण्यापेक्षा लाेकेशची प्रगती ही इतर क्षमतेच्या तुलनेत अभ्यासली जावी. त्याच्यात प्रचंड मानसिक क्षमता अाणि अाव्हानाचा सामना करण्याचे धाडस अाहे. यातून त्याच्या दमदार भविष्याचे संकेत मिळतात. मला इरफान पठाणची अाठवण हाेत अाहे. प्रतिभा असूनही त्याला गाेलंदाजी करावी की फलंदाजी याबाबतचे काेडे साेडवता अाले नाही. त्यामुळेच ताे मागे राहिला. अश्विन हा प्रतिभावंत खेळाडू अाहे. अायसीसीच्या क्रमवारीतही ताे टाॅप-१० मध्ये असताे. लाेकेश राहुल अाणि अश्विनने दृढसंकल्प, एकाग्रता, सहनशक्ती अाणि चांगल्या कामगिरीच्या इच्छाशक्तीचा प्रत्यय अाणून दिला. लाेकेशला राहुल द्रविडचा अाणि अश्विनला अनिल कुंबळेचा उत्तराधिकारी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याेगायाेगाने हे चारही खेळाडू दक्षिण भारतातील अाहेत. या दाेघांनीही सरस कामगिरी करताना अापल्या सहकाऱ्यांसमाेर अादर्श निर्माण केला. अाता टीममधील इतर खेळाडूंसमाेर अशाप्रकारच्या कामगिरीचे अाव्हान अाहे. अशा अाव्हानामुळेच टीम इंडिया अधिक मजबूत हाेऊन प्रतिस्पर्धींवर मात करत राहील.
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...