आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोहली-अँडरसन यांच्यात रोमांचक लढतीची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जेम्स अँडरसन खेळत आहे, ज्याने २०१४ मध्ये टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीला आपल्या स्विंग गोलंदाजीने त्रस्त केले होते. त्या वेळी अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले होते. त्याने मँचेस्टर कसोटीच्या दोन्ही डावांत त्याला टिपले होते. मात्र, या वेळी चित्र वेगळे आहे. पहिल्या डावात कोहलीने १६७ धावा काढल्या आणि दुसऱ्या डावात तो नाबाद ५६ धावांवर खेळतोय. अँडरसनला अद्याप कोहलीवर दबाव निर्माण करता आलेला नाही. दोघांत शारीरिक आणि मानसिक सामना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
अँडरसन दुखापतीतून सावरून संघात परतला आहे. मात्र, मीडियाला अद्याप अँडरसन-कोहली यांच्यातील द्वंद्वाची कसलीच कथा रचता अालेली नाही. कोहलीने पहिल्या डावात अँडरसनच्या ५६ चेंडूंत ३५ धावा काढल्या. यात ५ चौकारांचा समावेश आहे. दुसऱ्या डावात दोघांत बॅट आणि चेंडूचे द्वंद्व सुरू झालेच आहे. कोहलीने अँडरसनच्या ५ चेंडूंवर ४ धावा काढल्या आहेत. मात्र, लढत अजून सुरू आहे. चौथ्या दिवशी क्रिकेटप्रेमींनी उच्च दर्जाचा संघर्ष दिसू शकतो. इंग्लंडसाठी अँडरसन महत्त्वाचा आहे. कारण, २०१२-१३ मध्ये तो मालिका विजयात हीरो म्हणून पुढे आला होता. भारतात इंग्लंडपेक्षा वेगळी परिस्थिती असते. मात्र, अँडरसनने येथे तीन वर्षांपूर्वीच कमाल प्रदर्शन केले होते. या वेळी कोहली त्याला उत्तर देण्यास सज्ज झाला आहे.
मला कोहलीला बघून सचिनशी संबंधित एक आठवण येत आहे. कोहलीसुद्धा सचिनच्या पाऊल वाटेवर चालतोय. अशात सचिनच्या एका घटनेचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरेल. १९९१-९२ ची गोष्ट आहे. लंडन टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार जॉन वुडकाॅक यांना वाटले की जगाला सर डॉन ब्रॅडमनसारखा आणखी एक तारा मिळणार आहे. त्या वेळी ऑस्ट्रेलियात भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होती. वुडकॉक यांनी आपल्या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला या मालिकेचे वार्तांकन करण्याची इच्छा असल्याची विनंती केली. जगाला ब्रॅडमनसारखा एक तारा मिळाला असून, त्याचे नाव सचिन तेंडुलकर आहे, असेही त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले. त्यांना परवानगी मिळाली आणि ते पर्थ कसोटीसाठी पोहोचले. सचिनने तेथे आपल्या कसोटी कारकीर्दीचे तिसरे शतक ठोकले. सचिनने त्याआधी सिडनीतही शतक काढले होते. सचिनचे हे तिसरे शतक असले तरीही तो सर्वांना मागे टाकेल, असे त्या वेळी वुडकाॅक यांनी लिहिले होते. वुडकॉकची पारखण्याची दृष्टी जबरदस्त होती. ही खेळी सचिनच्या करिअरसाठी निर्णायक ठरेल. तो विश्व क्रिकेटचा बादशाह बनेल, असेही त्या वेळी वुडकॉक यांनी लिहिले होते. महान खेळाडूंचे संकेत एक किंवा दोन खेळीवरूनसुद्धा मिळू शकते. कोहलीसुद्धा सचिनप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शानदार फलंदाजी करून चमकला आहे. पुढचे एक दशक कोहली गोलंदाजांसाठी एक मोठे आव्हान असेल, असे क्रिकेट समीक्षक योग्यच म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...