आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayaz Memon Artical On Master Blaster Sachin Tendulkar

हृदयावर राज्य करत राहील मास्टर ब्लास्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन सतत 24 वर्षे हातात बॅट घेऊनच वावरत होता. शनिवारी सचिनच्या डोळ्यात अश्रू दिसले. पत्नी अंजलीचे डोळेदेखील पाणावले होते, तसेच तिथे उपस्थित प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. असाधारण उंचीपर्यंत पोहोचलेल्या या महापुरुषाने निवृत्तीच्या क्षणी केलेले भाषणदेखील अत्यंत भावुक होते. ते भावविभोर शब्द म्हणजे मनातून निघालेला आवाज होता. सचिनने 25 मिनिटांहून अधिक काळ भाषण केले.
मी जेव्हा सचिनला भेटलो होतो, तेव्हा तो 15 वर्षांचा होता. कुरळे केस असलेला हा बालक माध्यमांसमोर केवळ पुटपुटणेच जाणत होता. मात्र, पुढील 25 वर्षांत सारं काही बदलून गेलं. तो विश्वातला सर्वप्रिय क्रिकेटर बनला. त्याने आपल्या खेळाद्वारे धन आणि यश कमावतानाच लोकांच्या हृदयावर राज्य केलं. भारत सरकारने शनिवारी सचिनला भारतरत्न देण्याची घोषणा केली. निवृत्ती घेताना काहीसा नाराज असला तरी भारतरत्नच्या वृत्ताने त्यालाच नव्हे सर्व देशवासीयांना आनंद झाला. मागील तीन आठवड्यांपासून देशभरात केवळ सचिनच्या निवृत्तीचीच चर्चा होती. सचिनला पुन्हा मैदानात पाहता येणार नाही, म्हणून जनता उदास होती. अखेर तो क्षण आला आणि सचिन निवृत्त झाला. भारतातील 60 टक्के जनता 25 वर्षांपेक्षा कमी वयाची असून ते सारे त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. त्याच्यावरील प्रेम असेच कायम राहण्याची शक्यता आहे.
सचिन गत अर्धशतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरला आहे. त्याच्या क्रिकेटमधील क्षमतांबाबत कुणीही आव्हान देऊ शकत नाही. त्याच कारणामुळे त्याला भारतरत्नदेखील मिळाले. शनिवारी त्याला भारतरत्न मिळाल्याचे कळताक्षणी संपूर्ण देशात चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा झाला. सचिनबाबत लोकांच्या मनात इतके प्रेम, आपुलकी आणि भावना का आहेत, ते केवळ क्रिकेटच्या नजरेतून बघून समजणार नाही. ते जाणण्यासाठी एक संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या रूपात त्याच्याकडे बघावे लागते. यामध्ये सचिन हा एक चांगला पिता आणि पती आहे. तो
दोस्तांचा दोस्त आहे. तो आईचा अत्यंत प्रामाणिक आणि गुणी मुलगा आहे. मात्र, त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो सर्वोत्कृष्ट माणूसदेखील आहे.